महाराष्ट्र

संगमनेर तालुक्यात डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धाचे आयोजन

संगमनेर तालुक्यात डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धाचे आयोजन

संगमनेर प्रतिनिधी : पंचायत समिती संगमनेर, सप्रेम संस्था व नवदृष्टी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने व डॉर्फ केटल केमिकल्स इंडिया प्रा.ली. यांच्या सी एस आर निधीमार्फत डॉर्फ केटल जंगल कप स्पर्धा २०२३ चे आयोजन संगमनेर तालुक्यात करण्यात आले आहे. या स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील १४७ गावांपैकी ५० गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेची सुरूवात संगमनेर येथील मियावाकी जंगल कप प्रशिक्षणाने झाली. यावेळी या प्रशिक्षणात गावातील सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, स्वयंसेवक यांनी मोठ्या प्रमाणात हजर राहून मियावाकीचे प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणला प्रमुख अतिथी मा. संतोष जगधने, डॉ. नागेश टेकाळे, डॉ. प्रकाश गायकवाड मा. अनिल नागणे गट विकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर यांची उपस्थिती होती. त्यानंतर गावातील लोकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन मियावाकी जंगल लागवड आपल्या गावामध्ये लावली या मियावाकी जंगलामध्ये ४२ प्रकारचे ३०० वृक्ष सप्रेम संस्थेतर्फे गावाला दिले जाणार आहे. ५० गावांपैकी ४२ गावांनी या चळवळीत सहभागी होऊन ३१ गावांनी वृक्षलागवड पूर्ण केली आहे. लवकरच काही दिवसात ५० गावांनमध्ये ५० मियावाकी जंगले तयार होणार आहे. या मियावाकी जंगलामुळे गावातील २% तापमानबद्दल घडून येणार असून गावातील पाण्याची पातळी वाढणार आहे.
या स्पर्धेमध्ये पंचायत समिती संगमनेर यांच्या माध्यमातून मा. अनिल नागणे गट विकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर यांच्या पुढाकाराने या स्पर्धेला गती मिळाली असून या स्पर्धेमध्ये शासन व सामजिक संस्था एकत्र आल्याने गावातील विकासाला चालना मिळाली आहे.


मा.अनिल नागणे गट विकास अधिकारी पंचायत समिती संगमनेर यांची सर्व मियावाकी जंगलाला भेट देणे सुरू आहे. त्यामुळे गावातील प्रश्न मा. अनिल नागणे हे थेट गावात जावून सोडवत आहे त्यामुळे लोकांच्या मनात गट विकास अधिकारी यांचा चेहरा एक अधिकारी म्हणून नाही तर गावातील प्रश्न समजून घेणारा अधिकारी असा आहे. मियावाकी जंगल लागवड प्रकलपच्या माध्यमातून गाव हे हरित होत आहे. लवकर हा प्रकल्प संगमनेर तालुक्यातील गावागावमध्ये जाणार आहे. सोबत हा मियावाकी जंगल प्रकल्प महाराष्ट्रातील अनेक तालुक्यात येणाऱ्या काही दिवसांत सुरू होणार आहे. लोकांना आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युगात एक सुंदर आणि मनाला भावेल अशी जागा या मियवाकीच्या प्रकल्पामधून सर्व गावांमध्ये तयार होत आहे. लवकरच संगमनेर तालुका हा हरित होणार आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे