आपला जिल्हामहाराष्ट्र

ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देण्यात येणारा युवा पत्रकार पुरस्कार इम्रान शेख यांना जाहीर

ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने देण्यात येणारा युवा पत्रकार पुरस्कार इम्रान शेख यांना जाहीर

कोपरगाव प्रतिनिधी – ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा युवा पत्रकार पुरस्कार मुंबई विचक्षण प्रकाशनचे वार्ताहर व महाराष्ट्र लघु वृतपत्र व पत्रकार संघाचे शहर सचिव श्रीरामपूरचे पत्रकार इम्रान शेख यांना जाहीर झाला आहे.
संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ डफाळ यांनी अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्काराची घोषणा केली. इम्रान शेख हे कमी वयातच पत्रकारिता पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण करीत असताना दैनिक युवा ध्येय वृतपत्राचे प्रतिनिधी तसेच मुंबई येथील विचक्षण प्रकाशन या वृत्त वाहिनेचे वार्ताहर म्हणून काम पहात आहे. समाजामध्ये घडणाऱ्या घटना, समाजकारण, राजकारण, कृषी, क्रीडा व आरोग्य अशा विविध बातम्या जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य पत्रकारितेचे माध्यमातून होत आहे. याचबरोबर महाराष्ट्र लघु वृतपत्र व पत्रकार संघाचे अध्यक्ष बरकत अली शेख यांनी वृतपत्रविद्या बाबत ज्ञान, अभ्यासूपणे मांडणी, अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचार रोखण्यासाठी संघामध्ये शहर सचिव पदाची नियुक्ती करून जबाबदारी सोपविण्यात आली.

अशोकनगर येथे अशोक पॉलिटेक्निक महाविद्यालयात नोकरी करीत असताना संस्थेचे संस्थापक लोकनेते माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचेमुळे नेहमीच प्रेरणा मिळत आहे. तसेच युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे व जिद्द सोशल फौंडेशनच्या अध्यक्षा सौ. मंजुश्री मुरकुटे, ज्येष्ठ पत्रकार भास्कर खंडागळे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे