शिवजन्मोत्सव निमित्त विधायक उपक्रमाचे सूर्यतेजचे कार्य शिवप्रेमींना प्रेरणादायी…- उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे
*शिवजन्मोत्सव निमित्त विधायक उपक्रमाचे सूर्यतेजचे कार्य शिवप्रेमींना प्रेरणादायी…*
*- उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे*
*आपेगांवच्या युवा परिवर्तन फाऊंडेशनचा ढाल, गौरवपत्र आणि आंबा रोप देवून सन्मान*
*शिवजयंती २०२१ निमित्त विधायक उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा सन्मान*
कोपरगांव प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील शिवजन्मोत्सव निमित्ताने समाजोपयोगी कार्य करणाऱ्या शिवप्रेमी स्वयंसेवी संस्थांचा सूर्यतेज संस्थेने आयोजित केलेला सन्मानाचा उपक्रम कौतुकास्पद असून उत्सवाची परंपरा टिकवतांना नवोदितांना प्रेरणा देणारा आहे. असे प्रतिपादन शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केले.
कोपरगांव च्या सूर्यतेज संस्थेच्या वतीने कोपरगाव फेस्टिव्हल, स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा अभियान अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्त कोपरगाव तालुक्यातील शिवजयंती सार्वजनिक उत्सव संघटना, संस्था, मंडळे यांचे करिता दि.१९ फेब्रुवारी २०२१ रोजी ‘विधायक उपक्रम स्पर्धा ‘ आयोजित करण्यात होती. या स्पर्धेत सहभागी कोपरगाव तालुक्यातील संस्थांचा छत्रपती शिवाजी महाराज यांचे वृक्षसंवर्धनाचे आज्ञापत्र व भारत सरकारचे आयुष मंत्रालय निमंत्रित सदस्य व शिवचरित्र व्याख्याते डॉ.श्री.शिवरत्न शेटे यांची स्वाक्षरी असलेले सन्मानपत्र आणि अंबावृक्षाचे रोप देवून सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, कोपरगाव तालुक्यातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे आयोजक दत्तोबा जगताप, श्रीमंत पवार सरकार संस्थानचे जनरल मुखत्यार महेंद्र पाटील, माजी नगराध्यक्ष व शिवप्रेमी मंगेशराव पाटील, माहिती अधिकारी सुरेश पाटील, प्रगतशील शेतकरी मंदार आढाव, गुरु शुक्राचार्य देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित दिलीपराव घोडके, शिवजयंती उत्सव समिती सदस्य मकरंद जोशी, गुरुद्वाराचे विश्वस्त सेवासिंग सहाणी, शांतता समिती सदस्य रियाज शेख, महाराष्ट्र शासन जिल्हा नियोजन समिती सदस्य विशाल झावरे, कोठारी हाॅस्पिटलचे संचालक डॉ.योगेश कोठारी, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव जाधव (शिरसगांव), ग्रंथपाल योगेश कोळगे यांचे सह मान्यवर उपस्थित होते.
सूर्यतेज संस्थेच्या वतीने २१ वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.या वर्षीही रयतेचे राजे श्रीमंत छत्रपती श्री शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांची जयंती सर्वत्र साजरी होत आहे.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी शिवजयंती उत्सवाचे विधायक स्वरूप विषद केले. तर कोपरगाव तालुक्यातील सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे आयोजक दत्तोबा जगताप, शिवजयंती उत्सव समिती सदस्य मकरंद जोशी, गुरुद्वाराचे विश्वस्त सेवासिंग सहाणी,शांतता समिती सदस्य रियाज शेख यांनी उपक्रमांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
या स्पर्धेत सहभागी युवा परिवर्तन फाऊंडेशन,आपेगांव (चित्रकला,निबंध, कबड्डी, डिजीटल अॅप, शिवव्याख्यान), सेवा फाऊंडेशन (रक्तदान शिबिर), कोपरगाव,ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्था (वृक्षारोपण व सामाजिक उपक्रम), ब्राम्हणगांव, बळीराजा पार्टी (सामाजिक उपक्रम), कोपरगाव,साई निवारा मित्र मंडळ (जंतूनाशक फवारणी यंत्र लोकार्पण), कोपरगाव, शिवभक्त प्रतिष्ठान(मुकबधीर विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप),सेवा प्रतिष्ठान(वृद्धाश्रमात भोजन व उपयोगी साहित्य वाटप), कोपरगाव, ग्रामस्थ शिरसगांव(शालेय साहित्य वाटप),शिवजागर एक विचारधारा फाउंडेशन, छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव समिती, कोपरगाव यांचा सन्मान करण्यात आला.
उपस्थितांचे स्वागत सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांनी तर सूत्रसंचालन मंगेश भिडे यांनी केले.
शिवजयंती उत्सव २०२२ निमित्त सूर्यतेज संस्थेच्या वतीने विधायक उपक्रम स्पर्धा आयोजित केली असण्याची माहिती समितीचे वतीने देण्यात आली आहे.तरी शिवप्रेमींनी प्रशासनाने नियम पाळून विधायक उपक्रम स्पर्धेत सहभागी व्हावे.असे आवाहन करण्यात आले आहे.