आपला जिल्हाआरोग्य व शिक्षण

प्रा.पंकज वाबळे सेट परीक्षा उत्तीर्ण

प्रा.पंकज वाबळे सेट परीक्षा उत्तीर्ण

कोपरगावप्रतिनिधी: गौतमनगर,ता.कोपरगाव,जि.अहमदनगर येथील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे,सौ.सुशिलामाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे विज्ञान शाखेतील रसायनशास्त्र विभागातील प्रा.पंकज वाबळे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मार्च २०२३ मध्ये घेतलेल्या राज्यस्तरीय सेट परीक्षेत यश संपादन केले आहे.

प्रा.पंकज वाबळे यांनी २०१७ -१८ मध्ये एम.एस्सी रसायनशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण पुणे येथील सर परशुराम (एस.पी.)महाविद्यालयात पुर्ण केले.त्यानंतर गौतमनगर येथील सौ.सुशिलामाई काळे कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विज्ञान शाखेत शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे या यशाबद्दल कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.आमदार श्री.अशोकरावजी काळे साहेब,व्हा.चेअरमन मा.श्री.छबुरावजी आव्हाड,संस्थेचे विश्वस्त, तसेच

आमचे सर्वांचे आधारस्तंभ कोपरगाव विधानसभा सदस्य विद्यमान आमदार मा.श्री.आशुतोषदादा काळे साहेब, आमच्या मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि संस्थेच्या मानद सचिव सौ.चैतालीताई काळे,सहसचिव सौ.स्नेहलताई शिंदे, प्रियदर्शनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे,तसेच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ यांचेसह सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका, शिक्षकेतर सेवक आणि महविद्यालायाचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच ते ब्राम्हणगांव,ता.कोपरगाव येथील रहिवाशी असून रयत शिक्षण संस्थेतील सेवानिवृत्त सेवक श्री.लक्ष्मण श्रीपत वाबळे यांचे चिरंजीव असून ब्राम्हणगांव परिसरातील नागरिकांकडून देखील त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे