आपला जिल्हा
ब्राम्हणगाव येथे उसाच्या क्षेत्रात बिबट्याचे दर्शन
ब्राम्हणगाव येथे उसाच्या क्षेत्रात बिबट्याचे दर्शन
कोपरगाव प्रतिनिधी :ब्राम्हणगाव येथील रामजी चांगदेव आसने यांच्या उसाच्या शेतात बिबट्याचे दर्शन झाले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर रात्री विनाकारण घराबाहेर पडू नये. त्यामुळे या परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रात्री-अपरात्री विनाकारण कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन ग्रामपंचायत प्रशानानेही केले आहे.
पण सलग तीन चार वर्षे बिबट्याचे दर्शन ब्राम्हणगावात ग्रामस्थांना होत आहे; पण आजपर्यंत वनविभागाला बिबट्या पकडण्यासाठी अपयश आले आहे .तो पुन्हा दिसल्याने येथे वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे. बिबट्या या परिसरात अधूनमधून फिरत असतो. नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.