सरपंच संदिप देवकर

जागतिक महिला दिनानिमित्त टाकळी ग्रामपंचायत चा अभिनव उपक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त टाकळी ग्रामपंचायत चा अभिनव उपक्रम

एक दिवसीय महिला सरपंच व महिला उपसरपंच म्हणून दिला मान.

कोपरगाव प्रतिनिधी -: आज दि. 08/03/2025 रोजी टाकळी ग्रामपंचायतीने जागतिक महिला दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन केले. त्यामध्ये सरपंच श्री. संदीप श्रीपत देवकर यांच्या संकल्पनेतून आजच्या महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान करनेहेतु एक दिवसीय महिला सरपंच म्हणून सौ. कल्पना लक्ष्मण मालकर व महिला उपसरपंच म्हणून सौ. भारती बाळासाहेब देवकर यांना संधी देण्यात आली. एक दिवसीय महिला सरपंच यांचा सत्कार श्री. संदीप भाऊ देवकर व एक दिवसीय महिला उपसरपंच यांचा सत्कार माजी सभापती सुनील भाऊ देवकर यांनी केला. तसेच गावातील महिला विजया नंदू आमले यांचा आदर्श महिला म्हणून सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमास कोपरगाव पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सौ. शबाना शेख मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच श्री संजय देवकर ग्रामपंचायत सदस्य श्री शशिकांत देवकर, सौ. रूपाली मालकर, श्रीमती. हिराबाई मोरे, ग्रामपंचायत अधिकारी श्री गुंड भाऊसाहेब, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका सौ कांता देवकर मॅडम, रणधीर सर, पोलीस पाटील श्री. राजेंद्र देवकर तसेच आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व इतर गावातील महिला उपस्थित होत्या.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे