आपला जिल्हा
आपल्या लोकनेत्याला कोरोना आजारातून लवकर मुक्त कर, यासाठी ब्राह्मणगावकारांनी घातले ग्रामदेवतेला साकडे
आपल्या लोकनेत्याला कोरोना आजारातून लवकर मुक्त कर, यासाठी ब्राह्मणगावकारांनी घातले ग्रामदेवतेला साकडे
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे यांना कोरोनाची लागण झाली आहे.आमदार साहेबांनी काळजी घ्यावी व कोरोनावर मात करून बरे व्हा असा सदिच्छा ब्राम्हणगावातील राष्ट्रवादीची कार्यकर्ते व सर्वच स्तरातुन ब्राम्हणगावातील ग्रामदैवत रेणुका माता मंदिरात जाऊन प्रार्थना केली.
आमदारसाहेब लवकरात लवकर ठिक होण्यासाठी ब्राम्हणगावातील राष्ट्रवादीची कार्यकर्ते प्रार्थना केली. यावेळी पंचायत समिती सदस्य श्रावण आसने, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने,गावातील गुरु प्रमोद जोशी,ग्रामपंचायत सदस्य सोन्याबापु कुऱ्हाडे ,आनंद भुजाडे,बाबासाहेब गायकवाड,सोनवणे सर, सचिन तांबे,रवींद्र बनकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.