*गोदा व्हॅली मध्ये योग शिबिराचे आयोजन* .
*गोदा व्हॅली मध्ये योग शिबिराचे आयोजन* .
कोपरगाव प्रतिनिधी : प्राथमिक आरोग्य केंद्र, रवंदे यांचेमार्फत दिनांक १८-०४-२०२२ रोजी योग शिबिराचे आयोजन गोदा-व्हॅली इंग्लिश मीडियम / इंटरनॅशनल स्कूल येथे करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र रवंदे येथील डॉ. मानसी कापरे आणि कोपरगाव येथील डॉ. झंवर यांनी उपस्थिती लावली. डॉ.झंवर यांनी विद्यार्थ्यांना योग करण्याचे फायदे सांगितले तसेच ओमकार आणि सूर्यनमस्काराचे महत्त्व समजावून सांगितले तसेच ओमकार आणि सुर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांकडून करून घेतले.
आपले आरोग्य उत्तम असेल तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मन एकाग्र होते, बुद्धीस चालना मिळते असे अनेक फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने घरी सकाळी आणि सायंकाळी उपाशीपोटी दररोज किमान पाच सूर्यनमस्कार करणे आवश्यक आहे हळूहळू सूर्यनमस्काराची संख्या वाढवत न्यावी असे या शिबिराच्या माध्यमातून सांगण्यात आले. विद्यार्थ्यांना योग अभ्यासाची गोडी लावणे हे या शिबिराचे उद्देश आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. कडलक मॅडम यांनी डॉक्टर मानसी कापरे आणि डॉक्टर झंवर यांचे संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने आभार मानले.