आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र
नगरसुल येथे मक्याचा चारा जळून ४५ हजार रुपयांचे नुकसान
नगरसुल येथे मक्याचा चारा जळून ४५ हजार रुपयांचे नुकसान
येवला प्रतिनिधी :- येवला तालुक्यातील नगरसुल येथील फरताळे वाडी येथील सुहास सोपान फरताळे यांच्या गट न- ४२१/ अ मधील साठवलेल्या मकाच्या चाऱ्याच्या वळाईला दिनांक १६-४-२०२२ रोजी रात्री ९.५०मिनिटांनी जवळ असलेल्या इलेक्ट्रिक पोल वर शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली.
आग ही जास्त मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे संपूर्ण ७ ट्रॅक्टर (ट्रॉली ) चारा जळून खाक झाला तरी शासकीय नियमाप्रमाणे शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्यात यावी ,असे शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नगरसुल येथील शेतकरी करीत आहे.