कुत्र्यांच्या हल्ल्यात निष्पाप काळवीट ठार
कुत्र्यांच्या हल्ल्यात निष्पाप काळवीट ठार
येवला प्रतिनिधी : येवला तालुक्यातील नगरसुल येथील फरताळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर ४२२ येथे काळवीट मृत्यू अवस्थेत असल्याची माहिती संतोष फरताळे, सचिन फरताळे, भाऊसाहेब फरताळे,मधुकर शिंदे यांनी वनविभागाला दिली वनविभागाने सतर्कता दाखवत ताबडतोब त्यांची टीम नगरसुल येथे पोहोचले. या काळविटाचा पंचनामा करून ताब्यात घेतले .
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नगरसुल येथील फरताळवाडी ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर ४२२ येथे काळवीट मृत्यू अवस्थेत दिसले त्याच्यावर कुत्र्यांनी हल्ला केला. त्यामुळे सदर काळवीट मृत्यू झाले होते. ही बाब तेथील ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी वनविभागाला या घटनेची माहिती मिळताच वनविभाग प्रमुख गोपाल राठोर अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदरील घटनेचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे व पुढील तपास वनविभाग प्रमुख गोपाल राठोर हे करत आहे