गोदा व्हॅलीमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा आनंदोत्सव साजरा
गोदा व्हॅलीमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा आनंदोत्सव साजरा
कोपरगाव प्रतिनिधी -: १९ ऑगस्ट २०२२ रोजी गोदा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल, इंटरनॅशनल स्कूल आणि जुनियर कॉलेज रवंदे येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झाला. या मंगलसमयी ओम साई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. चंद्रशेखर कदम, खजिनदार सौ. दिपाली कदम, सदस्या सौ. मीनल कदम तसेच स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. अनिता कडलक, गोदा व्हॅली जुनियर कॉलेजचे प्राचार्य शैलेंद्र निरगुडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांनी उत्स्फूर्तपणे कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमास शोभा आणली.
भगवान श्रीकृष्णाचा जन्म, त्याच्या बाललीला आणि श्रीकृष्णावर आधारित विविध कथा यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भगवान श्रीकृष्णाबद्दल एक विशेष आकर्षण असल्याने विद्यार्थ्यांना हा सण खूपच आवडतो.त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपल्या सण-उत्सवाबद्दल माहिती व्हावी तसेच मानवी मनोरे रचून एकमेकांना सहकार्य करून विद्यार्थ्यांमध्ये एकजुटीची भावना निर्माण करणे हे या सणाचे महत्त्व आहे.
असे कार्यक्रम शालेय स्तरावर आयोजित केल्यामुळे विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे नियोजन करणे, सजावट करणे, सूत्रसंचालन करण्यास सांगणे, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देण्यास मदत मिळते. यासाठी दरवर्षी शाळेमध्ये असे सण उत्सव साजरे केले जातात, परंतु मागील दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे सण-उत्सव साजरे न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आज वेगळाच उत्साह आणि आनंद दिसून आला.श्रीकृष्णाच्या गाण्यावर अनेक विद्यार्थ्यांनी नृत्याच्या माध्यमातून आपली कला सादर केली. खोंड साक्षी आणि गाडे शंभू या विद्यार्थ्यांनी आणि दिपाली गोरडे मॅडम यांनी श्रीकृष्ण जन्माचे महत्त्व आणि माहिती सांगितली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील अंजली आहेर आणि मंडलिक मिथिला या विद्यार्थिनींनी केले.
गोरडे मॅडम, दवंगे मॅडम आणि निरगुडे सर या शिक्षिकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. तर कंक्राळे मॅडम, व्यवहारे मॅडम, थोरात मॅडम व पवार मॅडम या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नृत्य सादरीकरणात मदत केली.दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थ्यांनी अनेक मानवी मनोरे रचून उपस्थितांची मने जिंकली.