“शालेय अभ्यासक्रमाबरोबर कब बुलबुल व स्काऊट गाईड युनिट नोंदणी सुद्धा करावी मा गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांचे कोपरगाव तालुक्यात आवाहन”
“शालेय अभ्यासक्रमाबरोबर कब बुलबुल व स्काऊट गाईड युनिट नोंदणी सुद्धा करावी मा गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांचे कोपरगाव तालुक्यात आवाहन”
कोपरगाव प्रतिनिधी:- आज दिनांक 25 जुलै 2022 रोजी अहमदनगर भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालय व शिक्षकण विभाग प्राथमिक व माध्यमिक जि.प.अहमदनगर यांच्या सयुक्त विद्यमाने कोपरगाव तालुक्यात कब बुलबुल स्काऊट गाईड एक दिवसीय तालुकास्तरीय युनिट नोंदणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याच वेळी गटशिक्षणधिकारी कार्यालय कोपरगांव यांच्यातर्फे तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक स्काऊट मास्टर गाईड कँप्टन यांच्याकरिता आयोजित सहविचार सभा यामध्ये गटशिक्षणाधिकारी श्रीम शबाना शेख यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी क.भा.पा विद्यालयखचे मुख्याध्यापक श्री सुनिल कातकडे केद्र प्रमुख श्रीम भोईर मँडम विषयतज्ञ तथा स्काऊट गाईड तालुका प्रमुख श्री कांतीलाल गुरसळ उपस्थित होते यामध्ये कोपरगाव तालुक्यातील खूप मोठ्या प्रमाणात मुख्याध्यापक व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. यावेळी बोलताना माननीय गट शिक्षणाधिकारी यांनी उपस्थितांना आपल्या शाळेत शालेय अभ्यासक्रमाबरोबर कब बुलबुल स्काऊट गाईड नोंदणी करावी तसेच विविध उपक्रम राबवावेत असे आवाहन केले. यावेळी जिल्हा संघटक श्री.जी.जे भोर सर जिल्हा संघटक गाईड श्रीमती सोनाक्षी तेलंगे , यांनी देखील सविस्तर माहिती दिली या कार्यशाळेत श्रीम.वक्ते मँडम, श्री अविनाश भोसले , श्री घोरपडे सर , राजेंद्र सुरडकर,संजय शिंदे इत्यादी उपस्थित राहून सहकार्य केले.