साई अर्पण फाऊंडेशन तर्फे माय लेकी यांना सोबतच समाज भूषण पुरस्कार

साई फाऊंडेशन तर्फे माय लेकी यांना सोबतच समाज भूषण पुरस्कार
कोपरगाव प्रतिनिधी :- साई अर्पण फाऊंडेशन आयोजित कार्यक्रमात साई श्रद्धा अंगणवाडी कर्मचारी युनियन तालुका सचिव शिंगाडे लता अनिल व त्यांची कन्या कु.शिंगाडे राजश्री अनिल या दोघी माय लेकींना सोबतच समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .शिर्डी येथील साई अर्पण फाऊंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्काराने गौरवण्यात आले.
कोपरगाव तालुक्यातील साई श्रद्धा अंगणवाडी कर्मचारी युनियन तालुका अध्यक्ष मीनाताई दरेकर व सचिव लताताई शिंगाडे यांना समाजभूषण पुरस्कार मिळाला.
अंगणवाडी क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या तसेच सामाजिक क्षेत्रात बहुमोल कार्य करणाऱ्या लताताई अनिल शिंगाडे व त्यांची कन्या अनेक सामाजिक क्षेत्रात कार्य करतात तसेच त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अतिशय उत्तम अशी सरस्वती क्लासेस चालवून सेवा देतात तसेच शिक्षण क्षेत्रात त्यांचा कार्याचा बहुमोल वाटा व उत्तम मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी करत असतात .एक धडाडी प्रामाणिक नेतृत्व असणाऱ्या आपल्या सर्वांच्या ताई कु शिंगाडे राजश्री अनिल या दोघी माय लेकींना हा समाजभूषण पुरस्कार महंत काशीकानंद महाराज ,कुमारिका सरला दीदी, तज्ञ कृषीसेवक व मा.खा.भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शुभहस्ते व सारेगमप लिटल चॅम्प महाविजेती कोपरगावची कन्या गौरी पगारे यांच्या शुभहस्ते देण्यात आले.
यापूर्वी शिंगाडे यांना स्मार्ट अंगणवाडी ,आदर्श अंगणवाडी ,अहिल्याबाई होळकर पुरस्कार मिळालेले आहे .खऱ्या अर्थाने वाकचौरे साहेबांनी आज आपल्या व्यस्त राजकीय जीवनातून वेळ काढून आपले सामाजिक दायित्व जोपासात मतदार संघातील अनेक संत-महंत यांचे पूजन करून आशीर्वाद घेतले. यावेळी प्रत्येक तालुक्यातील अध्यात्मिक क्षेत्रात काम करणारी आणि आपल्या पुढच्या पिढीला संस्कारक्षम बनविणारी जेष्ठ मार्गदर्शक मंडळी उपस्थित होते शिंगाडे लताताई व शिंगाडे राजश्री यांना सोबतच समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.