लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा सन्मान करून एक आदर्श जयंती साजरी – मा. सभापती सुनिल देवकर
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचा सन्मान करून एक आदर्श जयंती साजरी – मा. सभापती सुनिल देवकर
कोपरगाव प्रतिनिधी: टाकळी येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने टाकळी येथील विद्यार्थिनी प्रांजल गोळेचा संजीवनी अकॅडमी येथे दहावीत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचा जयंतीचे निमित्ताने सन्मान केला तसेच टाकळी येथील गुरुदत्त माध्यमिक विद्यालय दहावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय ,तृतीय क्रमांक मिळवलेल्या साक्षी पाईक .वैष्णवी खारके. कोमल शिलावंत या मुलींचा देखील सन्मान करण्यात आला .
तालुक्यात एकमेव असं गाव या टाकळी गावात जयंतीच्या निमित्ताने मिरवणुकीला फाटा देऊन सर्वांना यांच्या आदर्श अण्णाभाऊ साठेंचे घराघरात विचार रुजवा त्यांच्या मार्गदर्शनाने टाकळी गावातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवलेल्या दहावी विद्यार्थ्यांचा सन्मान करून एक आदर्श जयंती म्हणून तालुक्यात टाकळी या गावाने केल्याबद्दल असे मत माजी सभापती सुनिल भाऊ देवकर यांनी व्यक्त केली
यावेळी उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रावण शिलावंत. कार्यक्रमाचे प्रमुख मा सभापती सुनिल भाऊ देवकर .सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक पदी निलेश भाऊ देवकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला .ज्येष्ठ नेते छगनराव देवकर .ग्रामपंचायत सदस्य शशिकांत देवकर. पोलिस पाटील राजेंद्र देवकर .सागर सांगळे.हा कार्यक्रम यशस्वी करणारे रामभाऊ साळवे चांगदेव बंदरे योगेश साळवे प्रवीण साळवे भाऊसाहेब साळवे गणेश पगारे संतोष साळवे राजेंद्र साळवे रवींद्र साळवे राहुल साळवे शिवाजी साळवे संतोष पगारे गोरख पगारे रावसाहेब थोरात व समस्त टाकळी ग्रामस्थ उपस्थित होते.