महाराष्ट्र

किसान मार्चाच्या वतीने माजी आमदार सौ.स्नेहलता कोल्हे यांचा सत्कार

नगर – मनमाड महामार्गाचे काम मार्गी लावल्याबद्दल किसान मार्चाचे वतीने स्नेहलता कोल्हे यांचा सत्कार

कोपरगाव प्रतिनिधी: भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सचिव,माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नगर – मनमाड (७५२जी ) महामार्गाच्या विकास कामासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे अहमदनगर दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सावळीविहर- कोपरगाव हद्दीतील कामांसाठी दिडशे कोटीं रूपयांचा निधी दिला आहे त्याबद्दल दि. ४ ऑक्टोबर रोजी भाजपा प्रदेश सचिव,माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष सुनिल देवकर आणि कार्यकर्त्यांनी त्यांचा निवासस्थानी जाऊन शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांचे आभार मानले आहे.


कोपरगाव शहराजवळुन जाणारा नगर – मनमाड (७५२जी ) महामार्ग चे रूपांतर खड्डयात झाले आहे.आजामितीला गाडी चालक व प्रवाशांना मानानिक व शारीरिक त्रास सहन करावा महामार्गा विकासाचा प्रश्न तालुक्यासाठीच नव्हे तर शेजारील जिल्हा सह लगतच्या राज्यासाठी ही हा कळीचा मुद्दा झाला आहे आहे.
परंतु आता माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांनी या महामार्गाच्या विकासासाठी नेहमीच पाठपुरावा केला आहे अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले असुन अहमदनगर भेटीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हा नगर – मनमाड महामार्ग राज्याकडुन केंद्राकडे वर्ग करून कोपरगाव -सावळीविहीर हद्दीतील कामांसाठी निधी दिल्याने रस्त्याच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे या पाश्र्वभुमीवर तालुक्यातील नागरीकांनी सुटकेचा निश्वास टाकला असुन महाराष्ट्र प्रदेश सचिव,माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे आभार मानले आहे तसेच भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने सौ.कोल्हे यांचा सत्कार केला आहे .
याप्रसंगी कोपरगाव तालुका किसान मोर्चा तालुका अध्यक्ष सुनील देवकर जेऊर कुंभारी गावचे उपसरपंच जालिंदर चव्हाण टाकळीचे उपसरपंच संजय देवकर,मनीष तुपे माजी उपसभापती नवनाथ आगवन,करंजी तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष भिलारे,विनोद परदेशी,,मंगेश जाधव, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अनुराग येवले,गणेश भाटे,मनीष देवकर इंद्रभान चौधरी,प्रवीण भोसले, अनिल मालकर,अरुण भिंगारे, भिंगारे देवीदास,सुभाष शिंदे,किशोर दरेकर,मार्केट कमिटीचे संचालक बापू सुराळकर,माजी सभापती मच्छिंद्र केकाण,डॉ.गोरख मोरे राजेंद्र मोरे,किरण देवकर,अमर लोंढे, अतुल सुराळकर,मयूर राऊत,शरद सांगळे यांच्या सह शेतकरी बांधव उपस्थित होते,

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे