आपला जिल्हा

अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश गावात लॉकडाऊन जाहीर

अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांश गावात लॉकडाऊन जाहीर


कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही. कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने अहमदनगर जिल्ह्यात वाढता कोरोना संसर्ग पाहता आजपासून दहा दिवसांसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत”

कोपरगाव अहमदनगर जिल्ह्याचा कोरोना पॉझिटीव्ह रेट हा ५ टक्के पेक्षा जास्त आहे. यामुळे ज्या गावांमध्ये १० पेक्षा जास्त सक्रीय कोरोना बाधित आहेत अशा गावांमध्ये जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी आज पासून पुढील १० दिवसाकरीता लॉकडाऊन जाहीर केला आहे.

या निर्णयानुसार जिल्ह्यातील तब्बल ११ तालुक्यातील सुमारे ६१ गावांचा समावेश आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक २४ गावाचा समावेश आहे तर कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव या गावाचा समावेश आहे.

अकोले – लिंगदेव, वीरगाव, परखतपूर.

कर्जत – खांडवी, बाभूळगाव दुमाला

कोपरगाव – गोधेगाव.

नेवासा – कुकाणा.

पारनेर – वडनेर बु., कान्हुरपठार, गोरेगाव, दैठणेगुंजाळ, जामगाव, भाळवणी.

पाथर्डी- तिसगाव.

राहाता- भगवतीपूर, पिंप्री निर्मळ, अस्तगाव, कोर्‍हाळे, लोणी बु., लोणी खु., कोल्हार बु.

संगमनेर- गुंजाळवाडी, शेडगाव, निमगाव जाळी, आश्वी बु., आश्वी खु., पारेगाव बु., पानोडी, शिबलापूर, बोटा, उंबरी, पिंपरणे, वेल्हाळे, खळी, देवगाव, घुलेवाडी, वडगाव लांडगा, तळेगाव, घारगाव, चंदनापुरी, कनोली, निमोण, वडगावपान, सायखिंडी.

शेवगाव- भातकुडगाव, घोटण, दहिगावने, आव्हाण बु.

श्रीगोंदा- लोणी व्यंकनाथ, घारगाव, बेलवंडी, मढेवडगाव, शेडगाव, येळपणे, कौठा, कोळगाव, काष्टी.

श्रीरामपूर- बेलापूर खु., उक्कलगाव, कारेगाव.

या तालुक्यातील गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापणा दि. ४ ऑक्टोबर ते दि. १३ ऑक्टोबर २०२१ पर्यंत बंद ठेवत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी यांनी नुकतेच दिले आहेत.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे