चोरी झालेल्या पुरुष स्वच्छता गृहाची (मुताऱ्या) चौकशी व्हावी – अँड.नितीन पोळ
चोरी झालेल्या पुरुष स्वच्छता गृहाची (मुताऱ्या) चौकशी व्हावी- अँड.नितीन पोळ
कोपरगाव नगर पालिकेने धारणगाव रोड वर तीन ते चार पुरुष स्वच्छता गृह ( मुताऱ्या) उभारल्या होत्या मात्र गेल्या काही दिवसांपासून त्या गायब झाल्या असून चोरी गेलेल्या स्वच्छता गृहाची चौकशी व्हावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की धारणगाव रोड हा रहदारीचा रस्ता आहे तसेच अनेक व्यवसायिकाची विविध दुकाने आहेत
पूर्वी बस स्टॅण्ड मधून बाहेर पडताना भिंती लगत,माधव बागेजवळ, पोष्ट ऑफिस जवळ सार्वजनिक शौचालया जवळ तसेच डॉ बारहाते यांचे हॉस्पिटल छ संभाजी महाराज चौक या ठिकाणी नगर पालिकेने पुरुष स्वच्छता गृह उभारलेले होते
गेल्या काही दिवसांपूर्वी हे पुरुष स्वच्छता गृह अस्तित्वात देखील होते मात्र काही दिवसापासून हे स्वच्छता गृह आश्चर्यकारक रित्या गायब झाले असून त्यामुळे पुरुषांना अडचण निर्माण झाली आहे त्या मुळे नाईलाजाने या भागात उभ्या असलेल्या गाड्यांच्या आडोशाला उभे राहून पुरुष लघवी करतात मात्र त्या मुळे या परिसरातून ये जा करणाऱ्या महिलांची कुचंबणा होत असते या पूर्वी माजी मुख्याधिकारी दरेकर मॅडम यांना या भागात पुरुष व महिला साठी स्वच्छता गृह उभे करावी अशी मागणी केली होती मात्र एका बाजूला नगर पालिकेला स्वच्छता पुरस्कार मिळवण्यात यश आले मात्र या भागात स्वच्छता गृह गायब झाले असून त्या कडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही या भागात विविध व्यावसायिकांची दुकाने आहेत त्यामुळे ग्राहक व व्यावसायिक यांची मोठी अडचण होत आहे
त्यामुळे या भागातील गायब झालेल्या पुरुष स्वच्छता गृहांची चौकशी व्हावी व या भागात त्वरित नगर पालिकेने पुरुष स्वच्छता गृहाची उभारणी करावी अशी मागणी या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे