आपला जिल्हा

वेळापूरातील ३८  लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे विवेक कोल्हे यांच्या हस्ते भूमिपूजन.


वेळापूरातील ३८  लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे विवेक कोल्हे यांच्या हस्ते भूमिपूजन.

 

कोपरगाव प्रतिनिधी – सोमनाथ डफाळ

            तालुक्यातील वेळापूर ग्रामपंचायत अंतर्गत ३८.४५ लक्ष रु. च्या विविध विकासकामांचे भूमीपूजन  जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच पार पडले.    

याप्रसंगी सरपंच वैशाली सतीश भोसले, उपसरपंच सतीश बोरावके, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे संचालक विलासराव वाबळे, संचालक राजेंद्र कोळपे, भास्करराव तिरसे,  मोहनराव वाबळे, दिलीप बनकर, वसंत लकडे, डी.के. भोसले, कोपरगाव बाजारसमिती संचालक माधवराव गोसावी,  अशोक आहेर, माधवराव गोरे, निवृत्ती वैराळ, राजेंद्र वैराळ, सचिन गोरे, सोसायटीचे अध्यक्ष  हरिभाऊ गोरे, सर्व संचालक, ग्रामपंचायत सदस्य  उपस्थित होते. केंद्रीय रस्ते विकास मंत्री  नितीन गडकरी यांनी १५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सौ कोल्हे यांचे ग्रामस्थांनी  आभार मानले.

             श्री. विवेक कोल्हे पुढे म्हणाले की, आपल्या तालुक्यात सर्वात मोठा  रोजगारचा  प्रश्न मिटवण्यासाठी कोल्हे कारखान्याच्या माध्यमातून पॅरासिटामॉल औषधी प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे.  तर महिला बचत गटासाठी कोपरगाव औद्योगिक वसाहतीत महिला क्लस्टर माध्यमातून रोजगार निर्मिती होत आहे.वेळापूर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकासात्मक कामांना प्राधान्य देऊन गावचा नावलौकिक वाढवण्यासाठी सर्व सदस्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे असे ते म्हणाले. शेवटी उपसरपंच सतीश बोरावके यांनी आभार मानले.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे