ब्राम्हणगाव येथे डिजिटल स्वाक्षरीत सुधारित सातबारा मोफत वाटप
ब्राम्हणगाव येथे डिजिटल स्वाक्षरीत सुधारित सातबारा मोफत वाटप
कोपरगाव प्रतिनिधी: राज्य सरकारच्या महसूल व वनविभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मोफत सुधारित सातबारा वाटप मौजे ब्राह्मणगाव तालुका कोपरगाव येथे २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती निमित्त औचित्य साधून आज तलाठी कार्यालयाकडून निशुल्क सातबारा वाटप करण्यात आले.
तलाठी कार्यालय व प्रशासनाकडून सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात आले की सर्व खातेदारांनी आपापली सातबारा उतारे नेऊन त्यामध्ये नाव दुरुस्ती व बरोबर असल्याची खात्री करून घेण्याकरिता आव्हाण केले.मौजे ब्राह्मणगाव येथील सर्व खातेदारांनी आपापले सातबारा उतारा तलाठी कार्यालयातून घेऊन जावे असेही आव्हान करण्यात आले.
याप्रसंगी तलाठी कोल्हे मॅडम सरपंच माधुरीताई साईनाथ आहेर ,पोलीस पाटील रविंद्र निवृत्ती बनकर, अनुराग प्रभाकर येवले, रामदास चांगदेव असणे, रवींद्र अशोक पिंपरकर, साईनाथ आहेर, बाबासाहेब जगताप, चांगदेव आहेर, सोमनाथ बनकर, सतीश बोरावके ,विजय सोनवणे, पोपटराव सोनवणे, भाऊसाहेब सोनवणे, देविदास आहेर, बाबासाहेब असणे, नाना डोळे, सुरेश मोहनराव जाधव, लक्ष्मण जाधव, संजय शिंगाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.