ब्रेकिंग

नगरसुल – सायगाव रोडवर ट्रक – दुचाकी अपघातात एक ठार

नगरसुल – सायगाव रोडवर ट्रक – दुचाकी अपघातात एक ठार

येवला प्रतिनिधी – येवला तालुक्यातील नगरसुल ते सायगाव रोडवर वाईबोथी जवळ ट्रक आणि मोटर सायकल यांच्यात झालेल्या अपघातात मोटर सायकल स्वार जागीच ठार झाला असून मोटर सायकलचे तीन तुकडे झाले आहे.

 

ही घटना शनिवार दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली ट्रक नं. एम.एच ०६ ए.क्यु ६६५२ वरील चालकाने मोटर सायकल पे . एम.एच.१५ ए.एन ४८६१ ला फरताळे वाडी,सायगाव रोडवर (तालुका येवला)रमेश फरताळे यांच्या घरासमोर ही घटना घडली.
या अपघातात कै.अशोक एकनाथ खांडगे (वय ४३ )रा.कणकुरी ता.सिन्नर जि.नाशिक हे जागीच ठार झाले .भरथाव वेगाने ट्रक चालवत असल्याने या अपघातात मोटर सायकलचे तीन तुकडे झाले आहे.याबाबत प्रत्यक्षदर्शी दिपक बाबुराव फरताळे यांनी येवला तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे . या बाबतचा अधिक तपास तालुका पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे