जवाहर मेडिकल चे स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाली.या निमित्ताने माजी नगराध्यक्ष श्री.मंगेशराव पाटील यांनी श्री.जवाहरशेठ शहा यांची सदिच्छा भेट घेऊन सन्मान केला.
जवाहर मेडिकल चे स्थापनेला ५० वर्ष पूर्ण झाली.या निमित्ताने माजी नगराध्यक्ष श्री.मंगेशराव पाटील यांनी श्री.जवाहरशेठ शहा यांची सदिच्छा भेट घेऊन सन्मान केला.
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव प्रमुख चौकातील सुदेश टाॅकिज समोरील जवाहर मेडिकल हे जुने मेडिकल म्हणून ओळखले जाते.आजही बाहेरगांवहूनन आलेल्या नागरिकांना पत्ता सांगताना जवाहर मेडिकल जवळ असल्याचा पत्ता सांगितला जातो. या प्रसंगी त्यांचा सत्कार करुन शुभेच्छा देतांना जेष्ठ रंगकर्मी श्री.श्रीकांतजी बागुल, जेष्ठ नेते श्री.प्रमोदजी पाटील, जेष्ठ व्यापारी श्री.प्रभाकरशेठ वाणी, अंबिका तरुण मंडळाचे प्रमुख श्री.विनायकराव गायकवाड, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत श्री.सुशांतजी घोडके, श्री.दत्तात्रेयजी पगारे,माजी नगरसेवक श्री.संजयजी कांबळे,श्री.अनिलशेठ काले, श्री.सुरेशजी कांगुणे यांचे सह सावरकर चौकातील नागरिक उपस्थित होते.अहमदनगर जिल्ह्यातील मेडिकल क्षेत्रातील ५० वर्षांपासून मालक-चालक-संचालक असलेले श्री.जवाहरशेठ शहा एकमेव आहे.