महाराष्ट्र

अहमदनगर जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे-सोमनाथ डफाळ

अहमदनगर जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवावे-सोमनाथ डफाळ

कोपरगाव प्रतिनिधी- गेल्या कित्येक वर्षांपासून सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्था अहमदनगर जिल्ह्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या मान्यवरांचा गौरव करणार माहिती संस्थेचे अध्यक्ष सोमनाथ डफाळ यांनी दिली आहे.

या वेळी डफाळ यांनी अधिक माहिती देतांना सांगितले की, आपण या समाजाचे काही देणे लागतो हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन २०२१ या वर्षात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या मान्यवरांना सन्मान म्हणून पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असून यात प्रामुख्याने प्रगतशील शेतकरी, आदर्श गोपालक, आदर्श समाजसेवक, आदर्श सरपंच, शिक्षण रत्न, युवा पत्रकार, आदर्श आरोग्य सेवक, वृक्ष मित्र, आदर्श आरोग्य सेविका,आदर्श ग्रामसेवक, आदर्श तलाठी, आदर्श उद्योजक या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेल्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार असून या साठी अहमदनगर जिल्ह्यातील पात्र उमेदवाराकडून योग्य त्या कागदपत्रांसह आपला प्रस्ताव दि ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत
८७८८१९३८३९ या व्हाट्सअप क्रमांकावर अथवा अध्यक्ष ज्ञानतंत्र बहुउदेशीय संस्था ब्राम्हणगाव ता.कोपरगाव या पत्यावर पाठवावे असे आवाहन अध्यक्ष सोमनाथ डफाळ यांनी केले आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे