राजकीय

कोपरगांव तालुक्यातील ८ ग्रामपंचायती मधील ९ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूका

कोपरगांव तालुक्यातील ८ ग्रामपंचायती मधील ९ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूका

*२१ डिसेंबर रोजी मतदान व २२ डिसेंबर ला निकाल*

कोपरगाव –निधन, राजीनामा, अनर्हता व इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी जिल्हयातील पोट निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदार घेण्यात येणार आहे. राहाता तालुक्यातील ८ ग्रामपंचायती मधील ९ रिक्त जागांसाठी मतदान होणार आहे. अशी माहिती कोपरगांव तहसीलदार विजय बोरूडे यांनी दिली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार कोपरगांव तालुक्यातील वारी – २, खिर्डी गणेश-१ दहिगांव बोलका-१ कोळपेवाडी-१, घारी-१, मोर्वीस-१ गोधेगांव-१, शहापूर-१ अशा एकूण ९ ग्रामपंचायत सदस्यांच्या जागांसाठी पोटनिवडणूका होणार आहेत.

नामनिर्देशनपत्राचा नमुना https://panchayatelection.maharastra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांनी नामनिर्देशन पत्राचा नमुना ऑनलाईन भरुन त्याची प्रिंट आऊट घेऊन त्यावर स्वाक्षरी करावी केवळ असे स्वाक्षरी करुन सादर केलेले नामनिर्देशन पत्र ऑफलाईन स्वरुपात स्विकारण्यात येईल. या निवडणूकांसाठी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या दिवशी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वेळेत कोपरगांव तहसील येथे उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. ७ डिसेंबर २०२१ रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.

९ डिसेंबर २०२१ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल. त्याचदिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक चिन्हाचे वितरण करण्यात येणार आहे. २१ डिसेंबर, मंगळवार रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. २२ डिसेंबर २०२१ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारंपरिक पध्दतीने (OFF LINE) राबविण्यात येणार आहे. अशी माहिती ही श्री.बोरूडे यांनी दिली आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे