आपला जिल्हाब्रेकिंगमहाराष्ट्र

ग्रामसेवकाला केली लाकडी दांडक्याने मारहाण – तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ग्रामसेवकाला केली लाकडी दांडक्याने मारहाण – तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

एका किरकोळ कारणातून ग्रामसेवकाला चक्क लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आल्याची घटना सावेडी येथे घडली आहे. बाळासाहेब नाना आतकर असे ५७ वर्षीय मारहाण झालेल्या ग्रामसेवकाचे नाव आहे. त्यांनी या मारहाणी प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरूध्द पोलिसानी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

अमोल भीमराज वरखेडकर, वैशाली अमोल वरखेडकर आणि हर्ष अमोल वरखेडकर (सर्व रा. सावेडी) अशी गुन्हा करणार्‍या आरोपींची नावे आहेत. अमोल याने फिर्यादी ग्रामसेवक यांचा मुलगा प्रसाद याला काहीही कारण नसताना थांबवून,

‘माझ्याकडे काय पाहतो, निट पाहायचे नाही तर खूप मारीन’, असे म्हणून दम दिला.याबाबत ग्रामसेवक यांनी अमोल वरखेडकर याला जाब विचारला.त्याचा राग आल्याने अमोलने सदर ग्रामसेवक यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली व अमोल याची पत्नी वैशाली, मुलगा हर्ष यांनी आतकर व त्यांचा मुलगा प्रसाद यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत सांगितले आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे