आपला जिल्हाब्रेकिंग

*”वाळू तस्करीला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी”* – अँड.नितीन पोळ

*”वाळू तस्करीला सहकार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी”* – अँड.नितीन पोळ

कोपरगाव प्रतिनिधी : दस्तुरखुद्द महसूल मंत्री असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यात महसूल व पोलीस अधिकारी यांच्या आशीर्वादाने वाळू तस्करी जोरात सुरू असून या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची आर्थिक गुन्हे विभागाने चौकशी करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की नगर जिल्ह्यात कोपरगाव व श्रीरामपूर तालुक्यात गोदावरी राहता राहुरी,संगमनेर मध्ये मुळा प्रवरा या नद्यांच्या वाळू तस्करीत अनेक महसूल अधिकारी सहभागी असून या तालुक्यात बदली करून घेण्यासाठी लाखो रुपये वरीष्ठ अधिकारी यांना दिले जातात आणि हेच अधिकारी पदाचा कारभार पहात असताना वाळू तस्करीला सहकार्य करून मोठी माया जमा करतात
या नदीवरील वाळू ठेके नावाला प्रसिद्ध केले जातात मात्र बेकायदेशीर रित्या
ट्रॅक्टर,डंपर,जेसीबी पोकलँड, यांच्या द्वारे वाळू उपसा केला जातो त्यासाठी महसूल विभागातील कोतवाला पासून तलाठी,तहसीलदार , प्रांत विभाग व त्यातील अधिकारी तसेच स्थानिक बिट हवालदार यांच्या पासून पोलीस स्टेशनचे अधिकारी ते थेट वरिष्ठ यांचा सक्रिय सहभाग असून या सर्वांना वाळू वाहतुकीच्या बदल्यात दरमहा विशिष्ठ रकमेचे हप्ते दिले जातात व ही रक्कम वसूल करण्यासाठी या यंत्रणेने स्वतंत्र वसुली अधिकारी नेमलेले आहे
महसूल विभागाने वाळूचे ठेके दिले असले तरी नावालाच शासनाच्या नियमाप्रमाणे वाळू उपसा होत असून त्यावर नियंत्रण ठेवणारी कोणतीही यंत्रणा लक्ष देताना दिसत नाही रोज होणारे वाळू उपशाचे मोजमाप नाही, यांत्रिक पद्धतीने वाळू उपसा करण्यास परवानगी नाही असे असताना जेसीबी पोकलँड यांच्या साहाय्याने सर्रास वाळू उपसा होत आहे त्याच प्रमाणे वाळू उपसा करणाऱ्या डंपरचे कोणतेही रेकॉर्ड नाही
या सर्वांवर नावालाच जिल्हास्तरीय पथक नेमलेले आहे मात्र चोरट्या वाळू वाहतुकीचे डंपर पकडण्या पेक्षा वसुली न झालेले डंपर बाहेरच्या तालुक्यातून जिल्हा पथक वाळूचे पकडून आणते, डंपर पकडताना ते बेकायदेशीर असते मात्र सदर डंपर हप्त्या देणाऱ्या यादीत असेल तर तास दोन तासात महसूल व पोलीस अधिकारी हेच डंपर कायदेशीर करून सोडून दिले जाते
या वाळू वाहतुकीला निव्वळ पोलीस व महसूल अधिकारी यांचेच आशीर्वाद आहेत असे नाही तर या परिसरातील अनेक राजकीय नेत्यांचे पंटर यात सहभागी आहे
सद्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे महसूल खाते गृह खाते,मुख्यमंत्री पद या तीन पक्षाकडे आहे त्यामुळे या लुटीत अधिकाऱ्या प्रमाणेच राजकीय पक्ष व त्यांचे पदाधिकारी सहभागी आहेत
त्यामुळे वाळू तस्करीत मोठी माया जमा करून वरीष्ठ पर्यंत जाते म्हणूनच या लुटीकडे कोणी लक्ष देत नाही मात्र त्यामुळे या भागात प्रचंड गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली आहे नदी कोरडी पडली असली तर त्यात अनेक अधिकारी यांनी आपले हात ओले करून घेतले आहे त्यामुळे या ठिकाणी असलेल्या महसुली व पोलीस अधिकारी यांच्या मालमत्तेची चौकशी झाल्यास मोठे आर्थिक रॅकेट उघड होईल तसेच या घोटाळ्याची किती खोली आहे हे देखील उघड होईल असेही या पत्रकात म्हटले आहे

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे