सांगवी भुसार येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी
सांगवी भुसार येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी
कोपरगाव प्रतिनिधी : सांगवी भुसार येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती साजरी करण्यात आली.अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर अनेक युद्धांमध्ये साहसी योध्याप्रमाणे विचारपूर्वक निर्णय घेत त्यांनी युद्धाचे नेतृत्व सुद्धा केले. शिवाय अहिल्याबाई अश्या शासकांमधून एक होत्या ज्या आपल्या प्रांताच्या रक्षणार्थ व अन्याया विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत.इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
यावेळी माणिकराव गयाजी शिंदे (रा. स. प उपाध्यक्ष अहमदनगर जिल्हा) ,रोहिदास शिंदे (व्हा. चेअरमन लो. पंडितराव आण्णा वि.का. सो. सांगवी भुसार ),बाळासाहेब शिंदे ,नवनाथ बंदरे ,सुनिल बंदरे ,राजेंद्र शिंदे, लक्ष्मण माळी, शंकरराव पगार, एकनाथ शिंदे, शंकरराव शिंदे, शरदराव शिंदे, बाबासाहेब गोसावी, निवृत्ती शिंदे, तान्हाजी जाधव, बाबासाहेब जाधव, अजीज भाई तांबोळी, गोरख बंदरे,महेश काळे (ग्रामसेवक) , ग्रामपंचायत कर्मचारी आदी ग्रामस्थ उपस्थीत होते.