कृषिवार्ता

मौजे ब्राम्हणगाव येथे क्रॉपसप योजनेअंतर्गत शेती शाळेचे आयोजन व ऑनलाइन शेतकरी स्पर्धेचे विजेत्यांचा सत्कार

मौजे ब्राम्हणगाव येथे क्रॉपसप योजनेअंतर्गत शेती शाळेचे आयोजन व ऑनलाइन शेतकरी स्पर्धेचे विजेत्यांचा सत्कार

कोपरगाव प्रतिनिधी : क्रॉपसप योजनेअंतर्गत मका पिक शेती शाळेचे मौजे ब्राह्मणगाव, तालुका कोपरगाव येथील श्री भागिनाथ आसणे यांच्या वस्तीवर आयोजन करण्यात आले होते .तालुका कृषी अधिकारी आढाव साहेब यांनी मका व सोयाबीन पिकाचे आंतरराष्ट्रीय व्यापारातील महत्त्व तसेच मका सोयाबीन पिका पासून तयार होणाऱ्या प्रक्रियायुक्त पदार्थ बाबत मार्गदर्शन केले .मंडळ कृषी अधिकारी श्री चंदन साहेब यांनी मका पिकावरील रोग व किडी तसेच खत व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन केले. उत्तमराव पुणे रिसोर्स फार्मर यांनी सेंद्रिय शेती तसेच मका पिकाला बेवड म्हणून मुग पिकाचे आंतरपीक म्हणून लागवड याविषयी मार्गदर्शन केले .कृषी पर्यवेक्षक राजेश तुंबारे यांनी इ पीक पाहणी तसेच कृषी विभागाच्या योजना विषयी माहिती दिली .

कृषी सहायक श्रीमती वाबळे मॅडम यांनी प्रास्ताविक केले तसेच उपस्थित महिलांना जीवामृत करण्याविषयी प्रात्यक्षिक व माहिती दिली .सहाय्यक कृषी अधिकारी या यूट्यूब चैनल वर अहमदनगर जिल्ह्यातून बीजप्रक्रिया व्हिडिओ अपलोड करून सहभागी व विजेते झालेले शेतकरी क्र १)श्री. भागिनाथ बाबासाहेब आसणे, क्र. २)श्री. उत्तमराव बादशहा पुणे क्र.३)प्रितेश पैठणकर या शेतकऱ्यांचे मा.पंचायत समिती सदस्य श्रावण आसणे मा.सरपंच सौ. माधुरी साईनाथ आहेर व ता. कृ आढाव साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. सदर शेतीशाळेस तालुका कृषी अधिकारी श्री. आढाव साहेब ,मंडळ कृषी अधिकारी चंदन साहेब ,पंचायत समिती सदस्य श्रावण आसणे ,सरपंच सौ .माधुरी साईनाथ आहेर कृषी पर्यवेक्षक राजेश तुंबारे तसेच कृषी सहाय्यक श्रीमती वाबळे मॅडम व तुषार वसईकर उपस्थित होते तसेच मोठ्या संख्येने महिला व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे