आपला जिल्हामहाराष्ट्र
*आण्णा भागीरथ जाधव यांना मातृ शोक*
*आण्णा भागीरथ जाधव यांना मातृ शोक*
कोपरगाव प्रतिनिधी : आण्णा भागीरथ जाधव यांच्या मातोश्री भीमाबाई भागीरथ जाधव यांचे वृद्धाप काळाने वयाच्या ७८ व्या वर्षी ब्राम्हणगाव मधील निवास स्थानी बुधवार दि ०६ जुलैला दुपारी दुःखद निधन झाले
मातोश्री भीमाआईने सर्वांना आपुलकीचे जिव्हाळ्याचे प्रेम दिल्याने त्यांच्या दुःखद निधनाची वार्ता कळताच ब्राम्हणगाव परिसर शोक सागरात बुडाला शोकमय वातावरणात सर्व क्षेत्रातील असं असंख्य जन समुदायात ब्राम्हणगाव स्मशान भूमीत मातोश्री भीमाबाईच्या पार्थिवावर अंत्यविधी झाले.
भीमाआईच्या मागे एक विवाहित चिरंजीव, तीन विवाहित कन्या, नातवंडे परतवंडे असा मोठा परिवार आहे. भीमाआईंच्या दुःखद निधनाने सर्वत्र शोकमय हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.