मी सोडली नाही….अन सोडणार नाही-आमदार कांदे
मी सोडली नाही….अन सोडणार नाही-आमदार कांदे
नांदगाव प्रतिनिधी-: मी किंवा आम्ही शिवसेना सोडलेली नाही,अन सोडणार ही नाही…असे जाहीर वक्तव्य नांदगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी केल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा द्विधा मनःस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.तर आमदार कांदे यांच्या नेतृत्व गुणांवर विश्वास ठेवत हजारो शिवसैनिकांनी आमदार कांदे यांना उद्देशून “तुम्ही हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेत असल्याने आम्ही तुमच्या सोबत असल्याची ग्वाही यावेळी दिली.
राज्यातील सत्ताबदलात महत्वपूर्ण भूमिका बजावलेल्या आमदार सुहास कांदे यांचे आज मतदार संघात आगमन झाले.शिवसैनिक,पदाधिकारी व सर्वसामान्य जनता यांनी उस्फूर्तपणे त्यांचे जंगी स्वागत केले.यावेळी मनोगत व्यक्त करताना पदाधिकाऱ्यांनी आमदार कांदे यांना उद्देशून ‘तुम्ही जो निर्णय घेतलाय,त्या निर्णयाशी ठाम राहू…असे मत बहुतांश नेत्यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी आमदार सुहास कांदे यांनी बोलताना सांगितले की आजही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे आम्ही शिवसेना सोडलेली नाही शिवसेना सोडणार नाही आणि आता आमचे नेते एकनाथ शिंदे तर मुख्यमंत्री झालेले आहेत तेव्हा त्यांच्या मार्गदर्शनाने मतदार संघाचा विकास करत पुढील वाटचाल करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मतदार संघाला दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करणे हे ध्येय ठेवून अधिक जोमाने कामाला लागणार असल्याचे आमदार सुहास कांदे यांनी सांगितले.
यावेळी बापूसाहेब कवडे,विष्णू निकम सर, आनंद कासलीवाल ,सुभाष नाना कुठे, राजाभाऊ जगताप, अमोल नावंदर, विलास आहेर, गुलाब भाबड, किरण देवरे, सुनील जाधव, पंकज दादा निकम, अंकुश कातकडे, अनिल तात्या रिंढे,रफिक शेख,गोकुळ कोठारी,डॉ.सुनील तुझ, राजाभाऊ देशमुख,सुधीर देशमुख,बाळासाहेब आव्हाड , विजय इप्पर, राजेंद्र पवार, सरपंच अश्विनी पवार, दीपक सूर्यवंशी, नूतन कासलीवाल, सुनील कासलीवाल, संदीप सूर्यवंशी, प्रमोद चव्हाण, किशोर लहाने, राजेश शिंदे, शिवसैनिक, पदाधिकारी, महीला आघाडी, मोठ्या संख्येने उपस्थित होते