आपला जिल्हामहाराष्ट्र

राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमात गुरुपौर्णिमे निमित्त जय्यत तयारी

राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमात गुरुपौर्णिमे निमित्त जय्यत तयारी

कोपरगाव / सोमनाथ डफाळ

अनेक दिवसांची परंपरा लाभलेल्या गोदावरी नदीच्या कडेला बसलेल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज ट्रस्ट कोपरगाव येथे गुरुपौर्णिमा उत्सव दिनांक १३ जुलै २०२२ रोजी साजरा करण्यात येणार आहे यासाठी मंदिर ट्रस्ट समितीने जय्यत तयारी केली आहे या उत्सवात सर्व बाबांजीच्या भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी स्थान व श्री काशी विश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्ट कोपरगाव या ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण होळकर यांनी केले आहे या उत्साहात सहभागी होण्यासाठी तालुका व जिल्ह्यांमधून मजल-दरमजल करत भाविक भक्त कोपरगाव येथील राष्ट्र संत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज मंदिराच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे

उत्सवाच्या निमित्ताने मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई चे काम पूर्णत्वाकडे जात आहे आलेल्या भाविक भक्तांसाठी अन्नछत्रचे पण काम सुरू आहे गुरुपौर्णिमा उत्सवा करिता विश्वस्त मंडळाने व भाविकांच्या मदतीने ५० क्विंटल बुंदी व ५० क्विंटल मसालेभात हा महाप्रसाद म्हणून वाटप केला जाणार आहे गुरुपौर्णिमा उत्सवा निमित्त समाधिस्थान परिसरात अनेक रंगीबेरंगी विद्युत रोषणाई व परिसरात भव्य मंडप डेकोरेशन करून समाधी मंदिराची संपूर्ण सजावट सजावटीचे काम सध्या सुरू आहे गुरुपौर्णिमा उत्सवाच्या दिवशी पहाटे ०४.०० वाजता नित्य नियम विधी महा समाधी स्थान पूजन सकाळी ०८.०० वाजता परम पूज्य बाबाजींच्या पादुकांची पाद्यपूजा भक्त निवास मध्ये होईल तसेच सकाळी १०.०० वाजता प्रमुख साधुसंतांची प्रवचने होतील व त्यानंतर दुपारी १२.०० वाजता आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे वरील सर्व कार्यक्रम परमपूज्य स्वामी रमेश गिरीजी महाराज परमपूज्य स्वामी मधुगिरीजी महाराज परमपूज्य स्वामी माधवगिरीजी महाराज परमपूज्य स्वामी दत्त गिरीजी महाराज व भाऊ पाटील त्र्यंबकेश्वर यांचे प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम होईल अशी माहिती राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज ट्रस्टचे (अध्यक्ष) दत्तात्रय बाळकृष्ण होळकर यांनी दिली याप्रसंगी ट्रस्ट चे (उपाध्यक्ष) विलासराव यादवराव कोते (सचिव) अंबादास दादा अंत्रे (विश्वस्त) त्रंबक कृष्णाजी पाटील रामकृष्ण बंडोजी कोकाटे अनिल बाप्पासाहेब जाधव संदीप मोहनराव चव्हाण आशुतोष विलासराव पानगव्हाणे अतुल बाबुराव शिंदे शिवनाथ सुभाषराव शिंदे तसेच सर्व विश्वस्त यावेळी उपस्थित होते

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे