कोपरगाव आगरातुन बस आत- बाहेर काढताना वाहन चालकांची होतीय मोठी कसरत
कोपरगाव आगरातुन बस आत- बाहेर काढताना वाहन चालकांची होतीय मोठी कसरत….
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव आगाराला पावसाचा फटका बसला असून खड्ड्यांमुळे आगरातून बस आत – बाहेर काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
त्यात पावसाचे पाणी साचल्याने आगारात पूर सदृश्य परिस्थिती आहे. कोपरगाव आगाराला बसच्या येण्या-जाण्यासाठी दोन प्रवेशद्वार असुन यात काही कामासाठी एक गेट गेल्या काही महिन्यापासून बंद केले आहे. परीणामी एकच गेटने आत बाहेर ये जा चालु असते .अनेकदा दोन तीन बस येत जात असताना चालकांना मोठी कसरत करावी लागते.
या ठिकाणी मोठ्ठे खड्डे झाले आहेत. त्यातूनच बस चालकांना मोठी कसरत करून बस काढावी लागत आहे. शिवाय पादचारी/ दुचाकी धारक अचानक घुसखोरी करत असतात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आत- बाहेर पडण्यासाठी दुसऱ्या द्वाराची व्यवस्था करावी अशी प्रवाशांची मागणी आहे शिवाय खड्डे बुजवून घ्यावीत अशी अपेक्षा आहे