नाटेगाव शाळेचा विद्यार्थी संस्कार गुंजाळ याची जवाहर नवोदय विद्यालय साठी निवड
नाटेगाव शाळेचा विद्यार्थी संस्कार गुंजाळ याची जवाहर नवोदय विद्यालय साठी निवड
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील आय एस ओ मानांकित जिल्हा परिषद शाळा नाटेगाव शाळेतील इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकत असलेल्या संस्कार मिलिंद गुंजाळ याने नवोदय परीक्षेत चांगल्या गुणांनी यश संपादन केले .त्याची नवोदय विद्यालय प्रवेशासाठी कोपरगाव तालुक्यातून निवड झाली आहे.
त्यामुळे शाळेच्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवण्यात आला आहे. हे यश संपादन करण्यामध्ये कोपरगाव तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती शेख मॅडम, येसगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख भोईर मॅडम यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. तसेच नाटेगाव शाळेतील मुख्याध्यापक श्री पाटील सर ,वर्ग शिक्षिका श्रीमती निळे मॅडम , मॅडम श्रीमती राऊत मॅडम, श्री मंचरे सर ,श्रीमती थोरात मॅडम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्याचे पालक व आहेरवस्ती शाळेतील उपशिक्षक श्री मिलिंद गुंजाळ यांनी अतोनात परिश्रम घेतले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.