आपला जिल्हा

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्याअध्यक्षपदी ना. आशुतोष काळे तर उपाध्यक्षपदी दिलीप बोरनारे यांची बिनविरोध निवड

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्याअध्यक्षपदी ना. आशुतोष काळे तर उपाध्यक्षपदी दिलीप बोरनारे यांची बिनविरोध निवड

कोपरगाव प्रतिनिधी – आशिया खंडात सहकार क्षेत्रातील अग्रगण्य व सहकाराची पंढरी असणा-या अहमदनगर जिल्ह्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची २०२२-२०२७ सालची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून एकून २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम नुकताच कारखान्याच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी श्रीमती पल्लवी निर्मळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून कारखान्याच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ना. आशुतोष काळे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी दिलीपराव आनंदराव बोरनारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

अध्यक्षपदाच्या नावाची सूचना राजेंद्र घुमरे यांनी मांडली या सूचनेस अनिल कदम यांनी अनुमोदन दिले.तसेच उपाध्यक्षपदाच्या नावाची सूचना सूर्यभान कोळपे  यांनी मांडली सदर सूचनेला प्रवीण शिंदे यांनी अनुमोदन देवून सर्व संचालकांच्या वतीने अध्यक्षपदी ना. आशुतोष काळे यांची व उपाध्यक्षपदी दिलीपराव बोरनारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती पल्लवी निर्मळ यांनी जाहीर केले.  

           निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष ना. आशुतोष काळे म्हणाले की, मागील पाच वर्षापासून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची जबाबदारी पार पाडत असतांना तोट्यात असणारा कारखाना सभासद व संचालक मंडळाच्या सहकार्याने नफ्यात आणला. त्याचबरोबर सभासदांच्या हिताचे निर्णय घेवून जिल्ह्यात ऊसाला एफ.आर.पी.पेक्षा जादा दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. मागील काही वर्षापासून अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असल्यामुळे मागील संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय घेवून कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने कारखाना विस्तारीकरणाचे काम हाती घेतले असून हे काम युद्धपातळीवर सुरु आहे. त्यामुळे २०२२-२३ चा गळीत हंगाम हा नवीन बॉयलर व नवीन मिलच्या माध्यमातून सुरु होणार आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि साखर धंद्याविषयी असलेली अनिश्चितता यामुळे साखर उद्योगापुढे अनेक आव्हाने आहेत. परंतु सहकाराची जपवणूक करतांना सभासद हित डोळ्यासमोर ठेवून माजी खासदार शंकररावजी काळे साहेब यांच्या आशीर्वादाने कारखान्याच्या प्रगतीसाठी माझी बांधिलकी कायम राहील. माझ्यावर पुन्हा एकदा मोठ्या विश्वासाने संचालकांनी आणि सभासदांनी टाकलेली जबाबदारी माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पाडून या कामधेनुच्या प्रगतीसाठी आणि सभासदांच्या हिताचाच विचार होईल अशी ग्वाही दिली. 

यावेळी ज्येष्ठ संचालक माजी आमदार अशोकराव काळे यांचेसह नवनिर्वाचित संचालक राजेंद्र घुमरे, सुधाकर रोहोम, वसंतराव आभाळे, सूर्यभान कोळपे, सचिन चांदगुडे, अनिल कदम, श्रीराम राजेभोसले, अशोक मवाळ, शंकरराव चव्हाण, मनोज जगझाप (माळी), शिवाजीराव घुले, सुनील मांजरे, दिनार कुदळे, प्रवीण शिंदे, डॉ.मच्छिंद्रनाथ बर्डे, महिला संचालक सौ. वत्सलाबाई सुरेश जाधव, सौ. इंदुबाई विष्णू शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे