जणू देवदूतच आले त्यांच्यासाठी धावून
जणू देवदूतच आले त्यांच्यासाठी धावून!
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे कर्तव्य दक्ष नेहमीच दिव्यांग, गरीब, रस्ता चुकलेल्या, गरजू लोकांना आपल्या नोकरीच्या वेतिरिक्त समाजाला आदर्शवत काही देणे लागतो याच अनुषंगाने नेहमीच अहोरात्र कष्ट करणारे पोलिस निरीक्षक वसुदेव देसले आणि त्याचे सहकारी रात्री पेट्रोलिंग करत असताना कोपरगाव शहरातील गोदावरी नदी च्या मोठ्या पुलावर किसन चव्हाण हा तरुण कौटुंबिक वादातून आपल्या पत्नी व दोन वर्षाच्या मुलासह आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचा अंदाज पोलिस निरीक्षक वासुदेव देसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आला असता त्यांनी किसन चव्हाण आणि त्यांच्या पत्नी यांना थोपविले व त्यांची समजूत कडून मित्र नातेवाईकांना बोलून त्यांच्या सोबत पाठविले
आज जर पोलिस निरीक्षक देसले आणि त्याचे सहकारी नसते तर कदाचित या जोडप्याने आपली जीवन यात्रा संपवली आसती परंतु आज पुन्हा पोलिस निरीक्षक वासुदेव देसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या रूपाने जणू देवच अवतले असे दिसते पोलिस निरीक्षक देसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कार्याचे कोपरगाव शहर
परिसरासह तालक्यात सर्वत्र कौतुक होते आहे