नितीन निकम यांचा सांगवीभुसार ग्रामस्थाच्या वतीने सत्कार
नितीन निकम यांचा सांगवीभुसार ग्रामस्थाच्या वतीने सत्कार
कोपरगाव प्रतिनिधी – महावितरणचे रवंदे कक्ष कनिष्ठ अभियंता निकम साहेब यांची नाशिक मंडलात कनिष्ठ अभियंता या पदावर बदली झाली आहे.
नितीन निकम यांनी मागील सात वर्षांच्या काळात जिल्ह्यात चांगल्या प्रकारे काम केले. वीज जोडणी, थकबाकीची वसुली, अखंडित वीजपुरवठा करण्याला प्राधान्य, सर्वसामान्य लोकांच्या घरात लवकर वीज पोहोचावी यासाठी धडपड केली. नाशिक येथील मंडलात बदली झाली असून लवकरच ते पदभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले.
निकम एन. आर हे लवकरच कनिष्ठ अभियंता पदाचा पदभार स्वीकारणार आहेत. निकम यांनीही महावितरणच्या विविध योजना, उपक्रमांची त्यांनी चांगली अंमलबजावणी करून नावलौकिक केले आहे. यावेळी सांगवीभुसारचे मार्गदर्शक राजेंद्र बापू जाधव ,विजय नाना जाधव, सरपंच रमेश आहेर, उपसरपंच मोहन कासार ,वसंतराव देशमुख ,विलास कासार,बाबुराव जाधव,पुंडलिक जाधव,किशोर वाकचौरे ,राजेंद्र जाधव ,संदीप बगाटे व ग्रामस्थ तसेच महावितरचे कर्मचारी सुनिल नागरे, संदिप आढाव आणि सहकारी उपस्थितीत होते .