अॅल्युमिनीयमच्या प्लेटने भरलेला ट्रक चोरणाऱ्या आरोपी पैकी एकास कोपरगाव पोलीसांनी केले जेरबंद
अॅल्युमिनीयमच्या प्लेटने भरलेला ट्रक चोरणाऱ्या आरोपी पैकी एकास कोपरगाव पोलीसांनी केले जेरबंद
कोपरगाव प्रतिनिधी- दि ११ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ट्रक क्रमांक सी जी – ०४ एल पी ५६०१ मध्ये चालक अजित कुमार सुर्यदेव यादव हा ट्रकमध्ये अॅल्युमिनीयम इग्नोट्स घेवुन जात असताना लोणी ते नांदुर शिंगोटे रोडवर कसारे शिवारात त्यास अनोळखी चोरट्यांनी त्यांचेकडील पॅशन मोटार वसायकल ट्रकला आडवी लावुन चार ते पाच अनोळखी चोरट्यांनी ट्रकमधील ड्रायव्हर व क्लिनर यांना रोडच्या कडेला झाडाला बांधुन आरोपींनी ट्रक व त्यामधील अॅल्युमिनीयम इग्नोट्स प्लेटसह रुपये ६१,५९,९०१ / -चा ऐवज घेवुन पळुन गेले होते. सदर बाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे .
सदर गुन्ह्याचा वरीष्ठांच्या मार्गदर्शनाने तपास सुरु होता. याच अनुषंगाने संजय सातव उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी , सदर गुन्हयाचे तपासी अंमलदार पांडुरंग पवार , पोलीस निरीक्षक संगमनेर यांनी माहिती दिली की , सदर गुन्ह्यात समाधान देविदास राठोड हा संशयीत असुन , तो सध्या त्याचे घरी करंजी , ता.कोपरगाव येथे आला आहे .
त्या माहितीच्या आधारे कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे पोहेकॉ इरफान शेख , पोकॉ आंबादास वाघ व पोकॉ रमेश झडे यांचे पथकासह करंजी परीसरात जावुन मिळालेल्या माहिती नुसार आरोपी समाधान देविदास राठोड यास रा.करंजी परिसरात सापळा रचुन ताब्यात घेतले व कोपरगाव पोलीस स्टेशनला आणले .
सदर आरोपीस उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी विश्वासात घेवुन , संगमनेर तालुका हद्दीत कसारे शिवारात अॅल्यूमिनीयमच्या प्लेटने भरलेला ट्रक चोरी बाबत विचारपुस केली असता , आरोपीने दादु,राजु , बद्रीआलम खान मुंब्रा , सलीम अली खान , मुंब्रा यांच्या मदतीने ट्रक वर दरोडा टाकला आहे असे कबूल केले आहे .
सदरची कौतुकास्पद कामगीरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधिक्षक दिपाली काळे,उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव सातव , यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव , पोहेकॉ इरफान शेख ,पोकॉ आंबादास वाघ व पोकॉ रमेश झडे यांनी केली आहे .