ब्रेकिंग

नवोदित कवी गीतकार पंडित निंबाळकर यांची शेतकरी जीवनावर आधारित सुंदर कविता

नवोदित कवी गीतकार पंडित निंबाळकर यांची शेतकरी जीवनावर आधारित सुंदर कविता

देह मायेचा झिजला

फाळ नांगराचा शिरे
काळजात आरपार
देह मायेचा झिजला
तेंव्हा पिकलं शिवार ||१||

माती ढेकळाची होई
रानं मऊसर दिसे
बैल जुंपू पांभरीला
मुठ चाड्यावर हसे ||२||

मागे किडे खाण्या येती
फौज घेऊन बगळे
बाळ झोक्यातून पाहे
कसे? राबती सगळे ||३||

औत हाकता म्हणतो
सर्जा राज्याची हो गाणी
संगे शिवार डोलता
नभ गाळतो रे पाणी ||४||

रूते धस्कट पायात
सांडे मातीत रगत
विडा चावून बांधतो
चिंधी फाडून पायात ||५||

गेली दमून सांजेला
पळ काढती घराला
रानं निजले काळोखी
दाणे अंकुरे तासाला ||६||

नको घाबरू तू धन्या!
आला बहर तुऱ्याला
काळ्या मायेची ही कुस
सुख घालते जन्माला ||७|l

कवी पंडित निंबाळकर
मु पो सांगवी भुसार ता कोपरगाव
जि अहमदनगर ७९७२५२३७१७

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे