महाराष्ट्र

1998-99 च्या दहावीच्या वर्गातील स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

1998-99 च्या दहावीच्या वर्गातील स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

येवला प्रतिनिधी -: 14 ऑगस्ट 2022 रोजी येवला येथे राम गीता हॉलमध्ये स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला. या स्नेहसंमेलनामध्ये जवळजवळ 23 वर्षापासून वेगळे झालेले मित्र पुन्हा एकत्र आले. न्यू इंग्लिश स्कूल नगरसुल येथील 98-99 ला असलेली दहावीच्या वर्गातील मुलांनी स्नेहसंमेलन आयोजित केले होते. या स्नेहसंमेलनामध्ये त्या शाळेतील जे शिक्षक शिकवण्यासाठी होते ते सगळे उपस्थित होते. तब्बल 27 शिक्षक व काही सपत्नीक स्नेहसंमेलनास उपस्थित होते या स्नेहसंमेलनामध्ये दहावीच्या वर्गातील शंभर विद्यार्थ्यांचा सहभाग होता जुन्या आठवणींना उजाळा देत चला खेळूया या उक्तीप्रमाणे कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमांमध्ये प्रास्ताविक राजेंद्र बारें यांनी केलं त्यानंतर सर्व शिक्षकांचा सत्कार करून सरस्वती पूजन करण्यात आले. शिक्षकांचे मनोगत सादर करत असताना अनेक सेवानिवृत्त शिक्षकांनी भाऊक होत उत्कांतपणे भाषण केले. आम्ही जरी तुम्हाला शिक्षा केली असेल तरी त्यावेळेस कोणी पालक शाळेत आले नाही की कोणी तक्रार केली नाही म्हणूनच आज तुम्ही घडला. त्याचबरोबर सर्व माझी विद्यार्थ्यांचा परिचय करण्यात आला आपल्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण यश संपादन केलं, वेगवेगळ्या क्षेत्रात आम्ही जे काही यश संपादन केलं हे सर्व त्यावेळचे शिक्षक आणि सवंगडी यांच्यामुळे ते शक्य झाले.काही कला साजऱ्या करण्यात आल्या एक अप्रतिम असा सोहळा या ठिकाणी बघायला मिळाला. जुन्या आठवणींना उजाळा देत काही मित्रांनी शाळेतील वेगवेगळे प्रसंग सांगितले आम्ही कसे घडलो स्वतःच्या पायावर कसे उभे राहिलो स्वतः वेगवेगळ्या क्षेत्रात देदीप्यमान अशी प्रगती केली याचे सर्व श्रेय आमच्या वंदनीय गुरुजनांना जाते अशी भावना यावेळेस तयार झाली. गेल्या एक महिन्यापासून जी तयारी चालू होती ती यशस्वी झाली.एक अद्भुत असा स्नेहसंमेलन घडून आले अनेक मान्यवरांचे गुरुजनवर्गांचे भाऊक भाषण हृदयामध्ये स्थान करून गेले यामध्ये आर.एम खैरनार सर, पगारे सर, बारे सर, वाघ सर, ताडगे सर, मुंडे सर करमासे सर, आव्हाड सर, देसले सर, नागपुरे सर, पुंड सर,खैरनार डी. एन., जाधव सर,भालेराव सर,श्रीधर नागरे,नागरे सर,कावाडे सर,अनर्थे सर,अहिरे सर, बी. एस. पैठणकर, ठोंबरे सर,पैठणकर सर, गायकवाड सर,दराडे सर,मगर सर,भाबड सर, बागडे मामा, पहिलवान म्याडंम अशा अनेक गुरुजनांनी आपले अनमोल मार्गदर्शन व तुम्ही करत असलेल्या कामाचा या देशासाठी नक्कीच फायदा करा व हे करत असताना तुमच्या आई-वडिलांना विसरू नका  हे ठणकावून सांगितले. कोणी डॉक्टर झाले कोणी शिक्षक झाले कोणी वकील झाले कोणी पोलीस झाले कोणी इंजिनियर झाले कोणी कंपनीत कामाला गेले कोणी शेतकरी झाले आपल्या मातीशी इमान ठेवा सर्वांचे फेटे बांधून व शेलापागोटे देऊन सत्कार करण्यात आला

एक आनंद व जल्लोष या ठिकाणी बघायला मिळाला. हे या सर्वांची आयोजक त्या वेळेचा वर्ग मॉनिटर प्रमोद शिंदे हा होता तो त्यांनी दिलेले सर्व टीम यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला किरण नागरे, गोकुळ आहेर, विनोद पाटील, डॉ. प्रदीप नागरे , राजेंद्र बार यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन झाले कार्यक्रमाचे आभार मानून पसायदानाने सांगता झाली. यावेळेस कार्यक्रम नियोजन विवेक निकम, सुशील खैरनार ,सचिन मुंडे, संदीप शिवाजी सोनवणे, संदीप मारुती सोनवणे, संदेश पैलवान, सुनील पोपट पैठणकर, संतोष पैठणकर, सचिन मुंडे, सचिन गंडाळ,योगेश पैठणकर, योगिता पुंड, माधुरी मालुंजकर, वनिता कमोदकर, कल्पना पैठणकर, रेणुका नागरे, मनीषा कुडके, मंदा पैठणकर वैशाली सोनवणे, सुराशे विष्णू, दत्तू आहेर, राजेंद्र टोणपे,पालवे गोरख,शिवलिंग शेलार,अनिल घुगे, रोहिदास निकम,रवींद्र गायकवाड,सानप गोरख, सोनवणे सुनील, चव्हाण अनिल,भाऊसाहेब फडताले,कवाडे महाराज,योगेश वाघ, कांतीलाल पैठणकर, आदी सह माजी विद्यार्थी उपस्थित होते.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे