आपला जिल्हा

५ नंबर साठवण तलावाच्या कामाला गती द्या ना.आशुतोष काळेंच्या सूचना

५ नंबर साठवण तलावाच्या कामाला गती द्या ना.आशुतोष काळेंच्या सूचना

कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव शहरातील नागरिकांना लवकरात लवकर नियमित स्वच्छ पाणी मिळावे यासाठी ५ नंबर साठवण तलावाच्या कामाला गती द्या अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

१३१.२४ कोटी रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या साठवण तलाव क्र. ५ च्या पावसाळयानंतर सुरू करण्यात आलेल्या कामाची नुकतीच ना. आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांनी साठवण तलावाच्या सुरू असलेल्या कामाची महिती घेतली. यावेळी ना.आशुतोष म्हणाले की,५ नंबर साठवण तलावासाठी मंजूर करून आणलेल्या १३१.२४ कोटी निधितील समावेश असलेल्या इतर कामांना प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र कामाला गती कमी आहे त्यामुळे साठवण तलावाच्या पुढील कामाला देखील गती देण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे.अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क करा मात्र लवकरात लवकर मुदतीच्या आत ५ नं.साठवण तलावाचे काम पूर्ण कसे होईल यासाठी सामूहिक प्रयत्न करून साठवण तलावाच्या कामाला गती द्या अशा सूचना ना.आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.

यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नगरपरिषद अभियंता सुनील ताजणे, मानवसेवा कन्स्ट्रक्शनचे विवेक पाटील, पाटबंधारे विभागाचे मिसाळ, लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे महेश मुंगेरीया, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगूले, शहर कार्याध्यक्ष संतोष चवंडके, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, रमेश गवळी, कृष्णा आढाव,अजीज शेख, फकीर कुरेशी, दिनकर खरे, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, राहुल देवळालीकर, चंद्रशेखर म्हस्के, रावसाहेब साठे, धनंजय कहार, वाल्मिक लहिरे, चांदभाई पठाण, सचिन गवारे, राजेंद्र आभाळे, महेश उदावंत, किरण बागुल, विलास पाटोळे, विजय शिंदे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे