ब्रेकिंग

ब्राम्हणगाव येथे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते वृक्षरोपण संपन्न

ब्राम्हणगाव येथे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्या हस्ते वृक्षरोपण संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी -: ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेच्या सामजिक विषयावर आधारित जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कोपरगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी सचिनजी सुर्यवंशी यांच्या वाढदिवसानिमित्ताने वृक्ष लागवड करण्यात आली.


वृक्ष लागवड अन् संवर्धन ही काळाची गरज आहे. शासन त्यच्या परीने काम करित असले तरी त्यासाठी लोकसहभागाची अत्यंत आवश्यकता आहे. ब्राम्हणगाव व परिसरात ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेच्या सामजिक विषयावर आधारित झालेली वृक्ष लागवड इतरांसाठी प्रेरणादायी असून त्याचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिनजी सूर्यवंशी यांनी केले.


नवीन झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे व आपल्या गावातील हिरवा परिसर पुढील पिढीसाठी जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे विशेषत: युवकांनी यासाठी पुढे येण्याचे आवाहन गटविकास अधिकारी यांनी केले.

यावेळी कोपरगाव पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी श्री साबळे साहेब, स्वच्छ भारत मिशन कक्षाचे सचिनजी बोरुडेसो ,तालुका समन्वयक नितीनजी मोरेसो, ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेचे सोमनाथ डफाळ, विक्रांत आसने, महेश मगर ,अमोल भुजबळ, गणेश फापले, देवा भागवत , जि. प शाळेचे मुख्याध्यापक श्री झाल्टे सर सर्व शिक्षक व विध्यार्थी शालीय समितीचे बाबासाहेब जगताप सर्व सदस्य ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विजयजी पाटील, ग्रा.पंचायत चे सर्व सदस्य कर्मचारी व पांडुरंग डफाळ, सीताराम कालेकर, संतोष भुजाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे