क्रिडा व मनोरंजन
कु.राजलक्ष्मी योगेश गव्हाणे ‘रोलर हॉकी’ स्पर्धेसाठी ‘महाराष्ट्र संघा’चे करणार प्रतिनिधित्व
कु.राजलक्ष्मी योगेश गव्हाणे ‘रोलर हॉकी’ स्पर्धेसाठी ‘महाराष्ट्र संघा’चे करणार प्रतिनिधित्व
चाळीसगाव – दि 11 ते 22 डिसेंबर दरम्यान बैंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय रोलर हॉकी स्पर्धेसाठी पुणे येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेतून महाराष्ट्र संघ निवडण्यात आला, या निवड चाचणीत शहरातील राष्ट्रीय कन्या शाळेची विद्यार्थीनी तथा योगेश गव्हाणे यांची सुकन्या कु.राजलक्ष्मी योगेश गव्हाणे हीची निवड करण्यात आली.
बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत कु.राजलक्ष्मी ही महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. कु. राजलक्ष्मीला क्रिडा प्रशिक्षक सुनील शिरसाठ यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल राजलक्ष्मी हीचेवर विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे