क्रिडा व मनोरंजन

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये कु.वेदश्री प्रदीप जोशी हिचे यश

राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये कु.वेदश्री प्रदीप जोशी हिचे यश

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव येथे १४ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या १३ व्या ट्रॅडिशनल शोटोकाँन कराटे राज्यस्तरीय चॅम्पिअनशिप स्पर्धेत श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल ,कोपरगावची विद्यार्थिनी व ब्राम्हणगांवची कन्या कु.वेदश्री प्रदिप जोशी हिने उल्लेखनीय यश संपादन केले.


कोपरगाव येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातून १० संघ सहभागी झाले होते. कु. वर्षा देठे मॅडम यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली अहमदनगर जिल्हा संघ या स्पर्धेत सहभागी झाला होता. कु. वेदश्री प्रदिप जोशी हिने आकरा वर्षे वयोगटातून कता प्रकारात गोल्ड मेडल व कराटे फाईट (कुमीते) प्रकारात गोल्ड मेडल मिळवून नेत्रदीपक यश मिळवले.तसेच ज्युनियर चॅम्पियनशिप मधे चॅम्पियन ट्रॉफी मिळवली.


या यशाबद्दल ट्रॅडिशनल शोटोकाँन कराटे राज्यस्तरीय अध्यक्ष श्री. सुदर्शन पांढरे सर, सरचिटणीस स्नेहल पांढरे मॅडम, प्रशीक्षिका कु. वर्षा देठे मॅडम तसेच श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल ,कोपरगाव या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वाकचौरे सर व वर्गशिक्षिका यांनी अभिनंदन केले. तसेच मुंजाबा ग्रामीण बहुउद्देशिय व ज्ञानतंत्र बहुउद्देशीय संस्थेच्या सर्व पदाधिकारी ,ग्रामस्थ व नातेवाईक यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे