आपला जिल्हा

सांगवी भुसार गावचे सुपुत्राची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष पदी निवड

सांगवी भुसार गावचे सुपुत्राची प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन

कोपरगाव प्रतिनिधी : नुकत्याच जाहीर झालेल्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य च्या नाशिक जिल्हा अध्यक्ष पदी सांगवी भुसार चे सुपुत्र बाबासाहेब पांडुरंग गोसावी यांची निवड झाली त्याबद्दल सर्वंच स्तरावरुन त्यांचे कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सांगवी भुसार चे नेते महानंदा दुध संघाचे माजी व्हाईस चेअरमन आदरणीय श्री राजेंद्र बापू जाधव यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच त्यांना भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.


बापू म्हणाले, ” बाबासाहेब गोसावी आणि त्यांचे कुटुंब गावात रहात होते. तेंव्हापासून बाबासाहेब हा मेहनती मुलगा यशा साठी धडपड करत होता. हालाखीच्या परिस्थिती मधून त्यांनी यश मिळवलं हे सर्वांना प्रेरणादायी आहे. सातत्याने सामान्य जनतेच्या हक्कासाठी संघर्ष करतं राहीले. आपल्या गावचे सुपुत्र म्हणून त्यांचा अभिमान वाटतो. “
बाबासाहेब ऊर्फ हेमंत गोसावी हे सध्या नाशिक येथे वास्तव्य करीत असले तरी गावा विषयी वाटणारी आपुलकी, प्रेम या धाग्याने ते आजही गावातील कवी पंडित निंबाळकर आणि मित्र परिवारा सोबत त्यांच्या संपर्कात ते नेहमीच असतात. खेडे गावात राहून शिक्षण घेत कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या प्रामाणिक कामाचा हा सन्मान आहे. असे म्हणत कवी पंडित निंबाळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.


“पत्रकारिता क्षेत्रात कार्य करतं असताना सर्व सामान्य जनतेच्या हक्कासाठी संघर्ष करतं राहीलो. त्यामुळे जबाबदारी मिळतं गेली. या पदामुळे संघर्ष करण्यासाठी बळ मिळेल.” असं ते संघर्ष न्यूज चे संपादक सोमनाथ डफळ यांच्या शी बोलताना म्हणाले. गावातील लोकां विषयी प्रेम आणि आदर त्यांच्या बोलण्यातून जाणवतं होता.
संघर्ष न्यूज चे संपादक सोमनाथ डफळ, कवी पंडित निंबाळकर, सरपंच रमेश आहेर, उपसरपंच मोहन कासार , विजय (नाना भाऊ) जाधव, बाळासाहेब कासार, विलास बगाटे, नंदकिशोर लांडगे, विलास कासार, निवृत्ती घोडे, दिनेश चव्हाण, किशोर बगाटे सांगवी भुसार इत्यादीं ग्रामस्थांनी पत्रकार बाबासाहेब गोसावी यांचे अभिनंदन केले.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे