राजकीय
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याला यश
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या पाठपुराव्याला यश
नांदगाव प्रतिनिधी: मनमाड येवला रस्त्याचे खड्डे बनवणे व डागडुजी चे काम सुरू मनमाड येवला रस्त्याची झालेली दुरवस्था आणि असंख्य खड्ड्यांमुळे गेल्या हप्त्यात एक तरुण मोटारसायकल स्वराचा दुर्दैवी मृत्यू झाला होता,या घटनेची दखल घेत आमदार सुहास आण्णा कांदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित रस्त्याचे खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आज या कामास सुरुवात झाली, या कार्यक्रमाचे उद्घाटन युवासेना नाशिक जिल्हा अधिकारी फरहान दादा खान यांनी केली,या प्रसंगी जेष्ठ शिवसैनिक,सर्व पदाधिकारी,आणि शिवसैनिक,सामान्य नागरिक उपस्थित होते…