आपला जिल्हा

विविध मागण्यासाठी श्रमिक मजदूर संघाचा मोर्चा…

विविध मागण्यासाठी श्रमिक मजदूर संघाचा मोर्चा…

कोपरगाव प्रतिनिधी – कोपरगाव तालुक्यातील सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ यांच्या वतीने जिल्हाध्यक्षा सौ. सविता विधाते यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती कार्यालयावर शालेय स्वयंपाकी व मदतनीस यांचा मोर्चा काढून गटशिक्षणाधकारी सौ शबाना शेख यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात म्हटले आहे की आजच्या महागाईच्या काळात दरमहा 1500 रुपये इतके मानधन दिले जाते. ते उत्पन्न दारिद्र रेषेपेक्षाही कमी उत्पन्न आहे. ते किमान वेतन प्रमाणे 15,000 रुपये मिळावे.स्वयंपाकी व मदतनीस यांना आरोग्य विमा शासनाच्या वतीने लागू करावा. इतर सर्व विभागाप्रमाणे गणवेश लागू करावा.

आहार शिजवीण्यासाठी लागणारे भांडे बदलून मिळावे तसेच मिक्सर व प्रेशर कुकर मिळावे, शालेय पोषण आहार ही योजना कायमस्वरूपी आहे त्यामुळे आहार शिजविणारे स्वयंपाकी व मदतनीस यांना शासकीय सेवेत सामावून घ्यावा अशी मागणी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी सौ. शबाना शेख यांनी मागण्याचे निवेदन त्वरित वरिष्ठ शासकीय पातळीवर पाठवून न्याय मिळण्याकरिता सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी तालुक्यातील शालेय स्वयंपाकी व मदतनीस मोठ्या प्रमाणात हजर होते.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे