महाराष्ट्र

गणराज प्रकाशन प्रकाशित व लेखक राजाभाऊ माळवे लिखित मायगाव देवी माहात्म्य ग्रंथ प्रकाशित

नगर जिल्हा साहित्यिक व सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध-- आ.आशितोष काळे

गणराज प्रकाशन प्रकाशित व लेखक राजाभाऊ माळवे लिखित मायगाव देवी माहात्म्य ग्रंथ प्रकाशित

नगर जिल्हा साहित्यिक व सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध– आ.आशितोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी– नगर जिल्ह्याची भूमी ही साधुसंत महंतांची पवित्र पावन भूमी आहे या भूमीत एक संस्कार आहे त्यामुळे नगर जिल्हा हा महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो अशा या पवित्र भूमीत साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये रुजली व त्यामुळे जिल्हा समृद्ध झाला आहे या जिल्ह्याने अनेक लेखक साहित्यिक या महाराष्ट्राला दिले आहेत असे प्रतिपादन ग्रंथ प्रकाशन प्रसंगी आ.आशितोष काळे यांनी केले.


गणराज प्रकाशन अहमदनगर प्रकाशित १८२ व्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नुकताच कोपरगाव येथील मायगाव देवी मंदिराच्या सभागृहात संपन्न झाला मायगाव देवी महात्म्य हा ग्रंथ लेखक राजाभाऊ माळवे यांनी लिहिला असून या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विजयराव जाधव हे होते तर ग्रंथ प्रकाशन माननीय आमदार अशितोष काळे साहेब तसेच राघवेश्वरानंद जी महाराज परमपूज्य विकासानंदजी महाराज यांच्या शुभहस्ते संपन्न झाले यावेळी विचार पिठावर सरपंच दिलीपराव शेलार उपसरपंच मुकुंदराव गाडे सुदामराव गाडे कृष्णराव गाडे कवी पंडित निंबाळकर साहेबराव गाडी माणिकराव शिंदे धोंडीराम गाडे काशिनाथ गाडे तसेच नंदकिशोर लांडगे निकम सर सोपानराव घोडे बाबासाहेब गाडे लक्ष्मण गोसावी राजेंद्र कदम राजेंद्र थोरात बापू जाधव दिलीप गाडे सचिन गाडे नवनाथ चुंबळे महेंद्र नाजगड प्रफुल्ल भुसारे राजेंद्र संजय मेहेरखांब व लेखक शाहीर राजाभाऊ माळवे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी देवीला पुष्पहार अर्पण करून व देवीची पूजा करून मुख्य प्रकाशन सोहळा समारंभाला सुरुवात झाली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखक शाहीर राजाभाऊ माळवे यांनी केले.


विचारपीठावर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते ग्रंथ प्रकाशन संपन्न झाले यावेळी विचार पिठावरील मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली उपस्थित संत महंतांनी मायगाव देवी महात्मे या ग्रंथ निर्मिती बद्दल लेखक शाहीर राजाभाऊ माळवे यांना अनेक अनेक शुभेच्छा देऊन त्यांच्या लेखन कार्याला आर्थिक सहकार्य करून प्रेरणा दिली.


अनेक मान्यवरांनी या ग्रंथ निर्मिती बद्दल लेखक राजाभाऊ माळवे यांचे स्वागत केले व या मायगाव देवीचे माहात्म प्रकाशित झाल्यामुळे महाराष्ट्रभरातून येणाऱ्या भक्तगणांना देवीचा महिमा शब्द रूपाने अध्ययन करायला मिळणार आहे या मुळे समाधान व्यक्त केले या ग्रंथाचे भक्तगणांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले .
या ग्रंथ निर्मिती बद्दल प्रा.गणेश भगत सर व गणराज प्रकाशनाचेही उपस्थित भक्तगणांनी आभार मानले असून ग्रंथ प्रकाशन सोहळ्यासाठी ग्रामस्थांनी परिश्रम घेतले ग्रामस्थ व भक्तगण ग्रंथ प्रकाशन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार गायकवाड सर यांनी मानले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंदराव गाडे यांनी केले.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे