आपला जिल्हा

लता शिंगाडे आणि अनुपमा सोनवणे ठरल्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या मानकरी

लता शिंगाडे आणि अनुपमा सोनवणे ठरल्या अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या मानकरी

कोपरगाव प्रतिनिधी -: ब्राम्हणगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कोपरगाव पंचायत विस्तार अधिकारी प्रशांतजी तोरवणे यांनी अहिल्याबाई होळकर यांनी केलेल्या कार्याची माहिती मनोगतातून दिली. या निमित्त शासन निर्णयानुसार समाजासाठी योगदान देणाऱ्या दोन महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या पुरस्कारासाठी समाजासाठी झटणाऱ्या महिलांचे कार्य व त्यांची माहिती ब्राम्हणगाव ग्रामपंचायतीने मागविली होती. निवड समितीने महिलांच्या कार्य कौशल्याचा विचार करून व कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी साहेब व बालविकास प्रकल्प अधिकारी वाघिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दोन महिलांची निवड केली.

यात लता शिंगाडे व अनुपमा सोनवणे या दोन महिला अहिल्याबाई होळकर पुरस्काराच्या मानकरी ठरल्या. त्यांना कोपरगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी तोरवणे व श्रावण आसने ,ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी विजयजी पाटील ,बाबासाहेब जगताप यांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर हा पुरस्कार देण्यात आला


यावेळी कोपरगांव पंचायत समिती विस्तार अधिकारी प्रशांतजी तोरवणे ,ग्रामविकास अधिकारी विजयजी पाटील,कर्मवीर शंकरराव काळे सहकरी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक श्रावण आसने ,बाबासाहेब जगताप, महाराष्ट्र साई श्रद्धा अंगणवाडी कर्मचारी युनियन तालुका सचिव शिंगाडे ताई व सर्व अंगणवाडी सेविका, ए.एन.एम. मैंद सिस्टर ,सर्व आशा , बचत गट प्रमुख अनुपमा सोनवणे , ग्रामपंचायत कर्मचारी सोमनाथ हुळेकर,गणेश आसने ,सचिन कांबळे,पांडुरंग शिंदे ,कैलास वाकचौरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे