आपला जिल्हा

संवत्सर येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपी पैकी २ आरोपींना शहर पोलिसांनी अवघ्या ६ तासात केले जेरबंद

संवत्सर येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपी पैकी २ आरोपींना शहर पोलिसांनी अवघ्या ६ तासात केले जेरबंद

२१ जून ला मोठ्या जल्लोषात झाले होते पेट्रोल पंपाचे उदघाटन

कोपरगाव प्रतिनिधी- गुरुवार दि २६ जून रोजी सांयकाळी सात ते साडे सात वाजण्याच्या सुमारास संवत्सर शिवारातील गुरुराज पेट्रोल पंप येथे फिर्यादी अमोल धोंडीराम मोहीते व कुणाल इंगळे यांचे पेट्रोल व डिझेल भरण्याचे काम चालु होते. त्यावेळी काळया रंगाचे पल्सर मोटार सायकलवर तीन अज्ञात इसमांनी येवून त्यांचे एक इसमांनी विनाकारण यातील फिर्यादी अमोल धोंडीराम मोहीते यांस धक्काबुक्की करुन त्याचे कानाखाली मारली त्यावेळी ते पाहुन पेट्रोल पंपाचे मॅनेजर भोजराज बाबुराव घनघाव वय ४० वर्षे रा.दहेगाव बोलका हे कॅबीनमधुन बाहेर आले व फिर्यादीस मारहाण करणारे अनोळखी इसमास तु माझ्या माणसाला का मारले बाबत विचारपुस केली असता, त्याला त्याचा राग आल्याने व त्याचे सोबत असलेले त्याचे इतर साथीदारांनी त्यास मारुन टाक सोडु नको असे म्हणाले तेव्हा त्या अनोळखी इसमांने मॅनेजर भोजराज बाबुराव घनघाव याची गचांडी धरुन त्यास धारदार चाकुने पोटात व खांदयावर वार करुन त्यांचेकडील पल्सर मोटार सायकलवर बसुन पळुन केले होते. त्यामध्ये जखमी झालेल्या मॅनेजर भोजराज बाबुराव घनघाव यांना उपचारकामी साईबाबा सुपर हॉस्पीटल शिर्डी येथे दाखल असतांना तो मयत झाला आहे.

सदरची घटना घडले बाबत माहीती प्राप्त झाल्याने तात्काळ घटना ठिकाणी जावुन पाहणी करुन सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता, सदरचा गुन्हा तीन अनोळखी इसमांनी मोटार सायकलवर येवुन केला असल्याचे निष्पन्न होत असल्याने नमुद अनोळखी तीन आरोपीचे शोधकामी दोन पथके तात्काळ तयार करुन शिर्डी व नाशिक येथे रवाना केले.झालेल्या घटने बाबत बाबत अमोल धोंडीराम मोहीते यांचे फिर्यादीवरुन तीन अनोळखी
इसमाविरुध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गु.रजि.नंबर ३१०/२०२३ भादवि कलम ३०२,३४ प्रमाणे दिनांक ३० जुन रोजी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीचे शोधकामी तयार केलेले पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज वरुन आरोपींचे फेसबुक, इंस्टाग्रामवरुन फोटो प्राप्त करुन त्यांचे वास्तव्या बाबत गोपनीय माहीती प्राप्त करुन आरोपींचा शोध घेवून शिर्डी येथुन एक व नाशिक येथुन एक असे दोन आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले आहे. असुन त्यांचा एक साथीदार फरार झाला असल्याचे त्यांने सांगितले आहे.

ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपीस गुन्हयाचे अनुशंगाने विचारुपुस केली असता, त्यांनी सदरचा गुन्हा पेट्रोलपंपावर धक्काबुक्की करुन झालेल्या वादातुन केला असल्याची कबुली दिली आहे. नमुद दोन्ही आरोपींना अटक करुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले हे करीत आहेत.


सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर , उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली, पो.नि.रामराव ढिकले, पोउपनि. रोहीदास ठोंबरे, पोउपनि. भरत दाते, पोकॉ जालींधर तमनर, पोकॉ संभाजी शिंदे, पोकॉ गणेश मैड, पोकॉ राम खारतोडे, पोकॉ गणेश काकडे, पोकॉ मैद, पोकॉ चव्हाण, पोकॉ बाळु धोंगडे, पोकॉ ज्ञानेश्वर भांगरे यांनी केलेली आहे.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे