अनुराग येवले

ब्राह्मणगाव ते कोपरगाव बस सेवा तात्काळ सुरु करा

ब्राह्मणगाव ते कोपरगाव बस सेवा तात्काळ सुरु करा

कोपरगाव प्रतिनिधी :- ब्राह्मणगाव येथील ग्रामस्त यांनी मा विवेक भैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वात कोपरगाव बस डेपो मॅनेजर यांना ब्राह्मणगाव ते कोपरगाव जाणारी दुपारी 12 ची एस टी सेवा तात्काळ सुरु करण्याचे निवेदन दिले.. ब्राह्मणगाव हे लोकसंख्या ने खूप मोठे गाव असून ब्राह्मणगाव हुन अनेक विध्यार्थी उच्च शिक्षण घेण्या साठी कोपरगाव येथे जातात.दुपारी कॉलेज सुटल्यावर घरी येताना कुठलीही बस सेवा नसल्याने विध्यार्थी व विधार्थिनी यांचे प्रचंड हाल होत आहेत..शेवट कुठलाही पर्याय नसल्याने उन्हा तान्हात पावसात भिजत ह्या विदयार्थी विध्यार्थिनी यांना पाई पाईपिट करत याव लागत. त्याच बरोबर अनेक जेष्ठ मंडळी महिला भगिनींना देखील कोपरगाव जाण्या येण्या साठी खूप हाल सोसावे लागतात .यापूर्वी वर्षानु वर्ष ही १२ ची बस सेवा सुरु होती परंतु करोना नंतर ही सेवा बंद झाली आहे .त्या मुळे लवकर बस सेवा सुरु करावी अशी विनंती निवेदना द्वारे केली आहे.


यावेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी कारखाना चे संचालक निवृत्ती भाऊ बनकर, भाजपा युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष अनुराग येवले पाटील, चांगदेव आहेर, दादा पाटील आसने, नानासाहेब शिंदे, राजेंद्र भोंगळे, मोतीराम शिंगाडे, शिवाजी येवले, बाबासाहेब आसने, आणासाहेब वाकचौरे, विजय कालेकर, केशवराव येवले,वैभव शिंगाडे ,गोरख शिंगाडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

श्री सोमनाथ पा. डफाळ

सदरील संघर्ष न्यूज पोर्टल मधील प्रसिध्द झालेला मजकुर बातम्या व जाहीराती तसेच व्हिडिओ यासाठी मजकुराबद्दल व संपादकीय मंडळ सहमत असेलच असे नाही .जरी काही वाद उध्दवल्यास न्याय क्षेत्र कोपरगाव राहील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
भाषांतर »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे