साई शक्ती इंग्लिश मीडियम शाळेत स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित्त ध्वजारोहण संपन्न
साई शक्ती इंग्लिश मीडियम शाळेत स्वातंत्र्याच्या महोत्सवानिमित्त ध्वजारोहण संपन्न
कोपरगाव -स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशभर हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत असून देशभर राष्ट्रप्रेमाला उधाण आले आहे. या मोहिमेत ओम साई ग्रामीण शिक्षण संस्था देखील सहभागी झाली असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुक्यातील पूर्व भागातील एकमेव महाराष्ट्र शासन मान्य असलेल्या ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेच्या साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूल कासली या शाळेत देखील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांच्या अध्यक्षतेखाली आंचलगाव येथील जेष्ठ नागरिक प्रकाश शिंदे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले.
देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशाप्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. प्रत्येक गाव आणि शहरातील प्रत्येक घरावर डौलाने फडकनाऱ्या तिरंग्यामुळे प्रत्येक देशवासीयांच्या हृदयात देशप्रेमाची ज्योत जागृत होवून संपूर्ण देश एकसंघ असल्याची प्रचिती येत आहे.
या प्रसंगी ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांनी अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित सर्व भारतीयांना शुभेच्छा देत आपल्या देशाची सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी प्रत्येकाने समता व बंधुत्वाची जपणूक करावी असे आवाहन करत आजच्या विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करत शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षेत सहभागी होत सदैव उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करायला हवे.जेणेकरून ग्रामीण भागातील सामन्य कुटूंबातील विद्यार्थी देखील उच्च अधिकारी बनू शकेल.
यावेळी साई शक्ती इंग्लिश मिडीयम स्कूल च्या इ ३ री च्या कु राजनंदिनी योगेश शिंदे व कु आरोही सुधाकर पगारे या विद्यार्थिनींनी देश भक्तीपर गाण्यावर शानदार नृत्य करत सर्वांची मने जिंकली.
या प्रसंगी शाळेचे अथर्व निलेश औटी, शिवांश गणेश शिंदे, स्वरा रामेश्वर शिंदे, आदित्य ज्ञानेश्वर शिंदे, आयुष योगेश पाठक, ओवी सचिन शिंदे, श्लोक सचिन शिंदे, समाधान वाल्मिक जिरे, कार्तिक मिथुन जाधव, यश कालिदास शिंदे, आराध्या नितीन बागुल,स्वरा दीपक जमधडे, यश शरद ढेपले, शिवराज अमोल शिसोदे, पूर्वी नितीन शिंदे, आयुष मनोज पवार, शुभम मनोज पवार, आदित्य मधुकर पगारे, आरोही सुधाकर पगारे, राजनंदिनी योगेश शिंदे, स्वरूप योगेश परजणे, स्वामी योगेश परजणे, स्नेहल पोपट मांडवडे, राज शैलेश शिंदे, वैभव शैलेश शिंदे, प्राची पोपट मांडवडे, जीवन शिवराम जाधव आदी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन देशाविषयी इंग्लिश हिंदी मराठी भाषेत भावना व्यक्त करत उपस्थिताची मने जिंकली.
या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समिती सदस्य नितीन शिंदे, आंचलगावचे ग्रामपंचायत सदस्य रामेश्वर शिंदे, वसंतराव परजणे, सचिन शिंदे, योगेश पाठक, पगारे आदी पालक उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक विजय जाधव सर यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे विलास चव्हाण सर, राजेंद्र आहेर सर, निलेश देवकर सर, रेखा दिवे मॅडम आदींनी परिश्रम घेतले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली कापसे मॅडम यांनी केले.